Eknath Khadse girish mahajan Praful Lodha .jpg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse : लोढाने तोंड उघडू नये म्हणून कोठडीत ठेवलंय, नाहीतर महाजनांचा पर्दाफाश होईल..खडसेंचा दावा

Honey trap case : राज्यात सध्या हनी ट्रॅपचं प्रकरण चांगलच गाजत आहे. त्यात जळगावचे प्रफुल्ल लोढा याप्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. त्यावरुन एकनाथ खडसेंनी गंभीर आरोप केले आहेत.

Ganesh Sonawane

Honey trap case : राज्यात सध्या हनी ट्रॅपचं प्रकरण चांगलच गाजत आहे. त्यात जळगावचे प्रफुल्ल लोढा याप्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. त्यावरुन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे व भाजपचे मंत्री गिरीश महाजन या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

खडसे यांनी म्हटलं आहे की, प्रफुल्ल लोढा याच्याकडे असलेले पुरावे व मटेरिअल त्यांनी इतरांना देऊ नये आणि तोंड उघडू नये यासाठी त्यांना वारंवार पोलिस कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. प्रफुल्ल लोढा जर जामिनावर बाहेर आलेत व त्यांच्याकडून सत्य निघाल्यास या प्रकरणाचा पर्दाफाश होईल..असा दावा करत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रफुल्ल लोढा याच्याकडून काही मिळण्यापेशा त्याच्याकडे जे मिळेल ते नष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच्याकडून काहीतरी मिळेल म्हणून त्याला छळलं जात आहे. लोढाकडून यांना पुरावे घ्यायचे आहेत व ते पुरावे नष्ट करायचे आहेत असा माझा सरळ आक्षेप असल्याचे खडसे म्हणाले. लढायचे असेल तर आमने-सामने येऊन लढा असे आव्हान खडसेंनी महाजन यांना दिले आहे. ते म्हणाले, मी जे काही करतो ते उमद्या मनाने करतो. मी मागून काड्या करणारा माणूस नाही. तसेच याला जेलमध्ये टाका, याच्या मागे ईडी लावा असेही करणाऱ्यातला मी नाही असा टोला खडसेंनी महाजनांना लगावला आहे.

खडसे पुढे म्हणाले, प्रफुल्ल लोढा हा सातत्याने गिरीश महाजन यांच्या बंगल्यामध्ये राहायचा आणि याचा पुरावा देण्याची गरज नाही ते कुणीही सांगेल. तसेच मी असे कधीही म्हटले नाही की मला लोढा भेटलेला नाही. मी पहिल्यांदाच सांगितले होते की, माझा सुद्दा लोढा सोबत फोटो असू शकतो. घटना घडली ती तारीख आणि प्रफुल्ल लोढावर साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाली ती तारीख यात पंधरा दिवसांचे अंतर आहे. पंधरा दिवस गुन्हा दाखल करण्यासाठी का लागले? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला. नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणात कोण कोण आहे, त्याचे मुळ शोधणं हा माझा विषय आहे. मी त्या पर्यंत लवकरच पोहचेल आणि शेवटपर्यंत नक्कीच जाईल असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.

दरम्यान लोढाच्या वक्तव्याचा दाखला देत महाजन यांनी खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी संदर्भात विधान केलं होतं. त्यावर खडसे म्हणाले, आता जर तु्झ्यात खऱ्या अर्थाने हिम्मत असेल, तुझी तेवढी पत असेल तर माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी कर असे खुले आव्हान महाजन यांना खडसेंनी दिले आहे. माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी आत्महत्येची तसेच खुनाशी चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करा मी तयार आहे असं खडसे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT