Devendra Fadnavis, Eknath Khadse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राष्ट्रवादीत येताच माझ्या मागे ईडी लावली ; ४० वर्ष तुमच्यासोबत चांगला होतो!

''तुम्ही जे करत आहात, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भोगावं लागेल, जनता तुम्हाला माफ करणार नाही,'' असे त्यांनी फडणवीसांचं नाव न घेता सुनावलं.

सरकारनामा ब्युरो

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व भाजपवर त्यांचे नाव न घेता निशाणा साधला. ते रावेर येथे कार्यक्रर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. तपास यंत्रणेला हाताशी धरुन भाजप सुडबुद्धीचं राजकारण करीत असल्याची आरोप खडसे यांनी केला.

''राष्ट्रवादीत गेल्यापासून आपल्या मागे ईडीची चौकशी लावली जात असून तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे,'' असे खडसे म्हणाले. ''चाळीस वर्ष जेव्हा मी तुमच्यासोबत होतो, तेव्हा चांगला होतो. मग आता राष्ट्रवादीत येताच माझ्या मागे ईडी (ED) का लावली गेली,'' असा सवाल खडसे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता उपस्थित केला. ''तुम्ही जे करत आहात, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भोगावं लागेल, जनता तुम्हाला माफ करणार नाही,'' असे त्यांनी फडणवीसांचं नाव न घेता सुनावलं.

खडसे म्हणाले, ''भाजप पक्षाच्या विस्तारासाठी मी गाव पातळीवर परिश्रम घेतले तसंच कष्ट केलं. मात्र, ज्या माणसाच्या बळावर तुम्ही इतके दिवस उभे राहिले, आता त्याचाच तुम्ही असा अपमान केलासध्याचं राजकारण तुम्ही पाहात आहात. कोणाच्या मागे ईडीच्या चौकशा लावल्या जातात, हे स्पष्टपणे दिसतं.

एकनाथ खडसे म्हणाले ''अनेक लोक घडवलेत, पक्षाच्या माध्यमातून मोठे केले. अनेक जण नाथाभाऊच्या आशीर्वादाने मोठे झालेत. कोणी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य झालेत. जिल्हा परिषद अध्यक्ष केले. मेहनतीने कष्टाने माणसं उभी केलीत. ३० वर्षापूर्वी एकटा आमदार होतो. पुढे पक्ष वाढत गेला. गावागावामध्ये पक्ष पोहोचला, साऱ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची मेहनत आम्ही केली,''

गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत नेऊन दाखवावे : एकनाथ खडसेंचे प्रत्युत्तर

जळगाव : नाथाभाऊंना (माजी मंत्री एकनाथ खडसे) ठाण्यात दाखविण्याची गरज नाही. पण, गिरीशभाऊंना (आमदार गिरीश महाजन, Girish Mahajan) पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी लगावला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी, ईडीकडून (सक्तवसुली संचनालय) अटक होणार असल्याच्या भीतीने खडसे यांना कोरोना झाल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT