Eknath Khadse On Eknath Shinde .jpg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News: एकनाथ खडसेंचा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले,'शिंदेंचा मला फोन,किती नगरसेवक फुटु शकतात...?'

Jalgaon Mahapalika Election : जळगावमध्ये 2018 रोजी महापालिका निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपनं 75 पैकी तब्बल 57 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली होती. या निवडणुकीत भाजपनं सुरेश जैनांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का दिला होता.

Deepak Kulkarni

Jalgaon News: राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराचा मंगळवारी (ता.13) अखेरचा दिवस होता. गेले काही सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रमुख नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण चांगलंच ढवळून काढलं. पण प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जळगावमध्ये विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) एक गंभीर आरोप करुन राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत हादरवणारा दावा केला आहे. एकीकडे प्रचाराच्या तोफा थंडावणार असतानाच खडसेंनी आपल्या भात्यातून टीकेचा बाण काढत थेट शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंवरच निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी आपला कट्ट्रर विरोधक असलेल्या भाजपवर टीका करण्याची संधीही सोडली नाही.

आमदार एकनाथ खडसे यांनी प्रचारसभेत बोलताना मागच्या पंचवार्षिक निवडणुकीचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, जळगावच्या महापालिकेच्या जागेसाठी मागील निवडणुकीवेळी मला एकनाथ शिंदेंचा फोन आला होता. जळगाव संदर्भात काय करायचं आहे, अशी विचारणा त्यांनी केली. महापालिकेचे किती नगरसेवक फुटू शकतात का? असं शिंदेंनी आपल्याला विचारल्याचा दावा खडसेंनी यावेळी सभेत केला. मला विचारलं होतं असं म्हटलं आहे.

त्यावर आपण त्यांना तुम्ही पाकिटे पाठवा,तीस ते पस्तीस नगरसेवक हे फुटू शकतात.त्यावर 27, 28 ते 30 नगरसेवक फुटू शकतात,असं एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) सांगितलं.तुम्ही जितकी पाकिटं द्याल,तितके नगरसेवक फुटू शकतात,असंही शिंदेंना फोनवर सांगितल्याचं खडसेंनी यावेळी सभेत बोलताना नमूद केलं.

मात्र, हा विषय कोणाला सांगू नका? गुलाबराव पाटलांना तर मुळीच नाही. गुलाबराव पाटील आणि सुरेश दादा जैन यांचं चांगलं जमतं. असा शिवसेनेच्या गोटात खळबळ उडवून देणारा दावा खडसेंनी केला. त्यामुळे गेल्या महापालिका निवडणुकीत फोडाफोडीचं राजकारण झाल्याच्या खडसेंच्या दाव्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

जळगावमधील सभेत एकनाथ खडसे यांनी भाजपवरही चौफेर टीका केली. ते म्हणाले,सध्या महाराष्ट्रात काय राजकारण सुरू आहे.अजित पवार हे केव्हा शरद पवारांसोबत असतात तर शिंदे हे काँग्रेस सोबत राष्ट्रवादी सोबत असतात काय चाललंय? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा हे सत्तेसाठी काही करायला तयार आहेत आणि सरकारमध्ये एकत्र आहेत,अशी टीका खडसे यांनी केला.

या महापालिका निवडणुकीत सर्वत्र पैशांचे पाकीटं वाटल्या जात आहे आणि ती पाकिटं भाजपकडून येत आहे. भाजपकडून जळगावात गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजप आता पहिल्यासारखी स्वच्छ प्रतिमेची राहिलेली नसल्याचा हल्लाबोलही खडसेंनी आपल्या भाषणात केला.

जळगावमध्ये 2018 रोजी महापालिका निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपनं 75 पैकी तब्बल 57 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली होती. या निवडणुकीत भाजपनं सुरेश जैनांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का दिला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शिवसेनेला अवघ्या 15 जागांवर विजय मिळवता आला होता. मिळाल्या होत्या. तसेच एमआयएमनं 3 जागांवर बाजी मारली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT