Devendra Fadnavis: पुणे,पिंपरी चिंचवडमध्ये युती, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पुन्हा चर्चा, CM फडणवीसांनी एकाच 'डायलॉग'मध्ये विषय संपवला

Pune Municipal Election News : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी एकत्र आल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत एकत्रीकरणावर साशंकता व्यक्त केली.
Devendra Fadnavis addressing the media in Pune while responding to questions on NCP unity and municipal corporation elections.
Devendra Fadnavis addressing the media in Pune while responding to questions on NCP unity and municipal corporation elections.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुण्यनगरी सातत्याने यश आम्हाला देते म्हणून प्रचारसभांची सुरुवात आणि सांगता येथे केली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर सह सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये लोकांची मानसिकता बनली आहे की आम्हाला मत देणार आहेत. त्यामुळे कोणी काही बोललं काही सांगितलं तरी लोकांची मानसिकता बदलणार नाही. लोकांनी भाजपाला निवडून द्यायचं ठरवलं आहे. असं फडणवीस म्हणाले.

अजित पवारांकडून भाजप नेत्यांवर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले , मी शब्द पाळणाऱ्यांपैकी आहे. मी आधीच सांगितलं होतं की पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये आमची युती होणार नाही. मात्र आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू... कोणाच्या विरोधात बोलणार नाही पण अजित दादांनी ते पाळलं नाही.

महापालिका निवडणुकीनंतर पुण्यामध्ये अजित पवारांना सोबत घेणार का? असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, आमचा विरोधकांनाही सोबत घेण्याच्या प्रयत्न असतो. पुण्यात अजित पवार आमचे विरोधक होते. मात्र राज्यात ते आमच्या सोबत असून महापालिका निवडणुकीनंतर त्यांना सोबत घेऊ असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis addressing the media in Pune while responding to questions on NCP unity and municipal corporation elections.
अजितदादांचीही शायरी, फडणवीसांच्या टीकेला दिलं उत्तर Ajit Pawar, Devendra Fadnavis, Pmc Election

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, हिंदीतली एक म्हण आहे. ती तंतोतंत लागू पडत नाही मात्र "कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे" अशी एक म्हण आहे. अजून एकत्रिकरण्याबाबत काही झालं नाही त्यावर इतका बोलणं योग्य नाही. दोन महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र लढत आहेत. मात्र 27 महानगरपालिकेत ते विरोधात लढत आहेत. त्यामुळे त्याच्यावर इतकी चर्चा का करायची असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis addressing the media in Pune while responding to questions on NCP unity and municipal corporation elections.
Pune News: अजितदादा विरुद्ध भाजप संघर्ष पेटला असतानाच DCM शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले,'लाडक्या बहिणीच पुण्‍याचा कारभारी...'

उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौरांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले ते दिल्लीत आमच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला जात असतील तर जाउद्यात. त्यासाठी ते जाऊ शकतात. त्यांना विमान सुद्धा देण्याची व्यवस्था मी करीन तिकीटही काढून देईल... जोपर्यंत आमच्या वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी आहे.. असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com