Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse: लढण्याची ताकद नसल्याने ईडी, सीबीआयची चौकशी

Sampat Devgire

जळगाव : आपल्याला अनेकांचा विरोध आहे, या विरोधकांची आपल्याविरुद्ध सरळ लढण्याची ताकद नाही, त्यामुळे आपली बदनामी करण्यासाठी ईडी, (ED) सीबीआय (CBI) तसेच आता दूध संघाचीही (Milk Fedration) चौकशी सुरू आहे. मी जेलमध्ये जाणार असल्याचेही विरोधकांकडून सांगितले जात आहे. परंतु ‘कर नाही त्याला डर नाही’ त्यामुळे आपण याविरूध्दही लढणार आहोत, असे मत राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी केले. (Eknath Khadse said i will face all political games against me)

आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते, तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ खडसे म्हणाले, खोके आणि पैशां‍वर तसेच विकास कामांवर निवडणूक जिंकता येते यावर आपला कोणताही विश्‍वास नाही, केवळ जनसंपर्कातूनच निवडणुकीत यश मिळते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढविला पाहिजे. याकरीता मतदार संघात यात्रा काढून लोकांच्या भेटीगाठी घेतल्या पाहिजे, त्या माध्यमातून पक्षाने केलेली कामे जनतेला सांगितली पाहिजे तरच त्याचा पक्ष बळकटीसाठी फायदा होईल. तसेच निवडणुकीत आपल्याला अधिक आमदार निवडून आणता येतील.

विरोधाला घाबरत नाही

पक्षाचे काम करीत असताना विरोध होत असतोच असे मत व्यक्त करून आमदार खडसे म्हणाले, मला तर मोठा विरोध होत आहे. आपली ईडी, लाचलुचपत विभाग, आता सीबीआय चौकशी सुरू आहे. दूध फेडरेशच्या माध्यमातूनही आपली चौकशी सुर आहे. परंतु आपण कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. कारण आपण काहीही केले नाही तर डर कशाला? त्यामुळे आपण न घाबरता संघर्ष करत आहोत.

‘राष्टवादी’चे जास्त आमदार

माजी मंत्री आमदार डॉ. सतीश पाटील म्हणाले, पक्ष बळकटीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कार्य केले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या विधानसभा क्षेत्रात काम केले तर आगामी विधानसभा निवडणुकीत आपले आठ पेक्षा अधिक आमदार निवडून येतील, याचा आपल्याला विश्‍वास आहे.

बंडखोरांविरूध्द वातावरण

माजी मंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर म्हणाले, शिवसेनेचे आमदार शिंदे गटात गेले आहे. ५० खोके आणि निधीची ताकद उभी केली जाणार आहे. परंतु जनतेला पक्षांतर पसंत पडलेले नाही. त्यामुळे बंडखोरांविरोधात वातावरण आहे, त्यामुळे मतदार संघात संपर्क करून जनतेत जागृती करण्याची गरज आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले, पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT