Eknath Khadse Fraud Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse : एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार, ५०९ सारखा गुन्हा दाखल ; शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप, खडसेंचा पलटवार

Chandrakant Patil On Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यावर खडसे यांनी देखील त्यांच्यावर पलटवार केला आहे. दोघांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

Ganesh Sonawane

Eknath Khadse News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे व शिवसेना शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. खडसेंवर यापूर्वीच्या कायद्यानुसार ५०९ सारखा गुन्हा दाखल असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

एकनाथ खडसे हे अपघाती मंत्री होते, त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही धोबीपछाड देत आहोत . खडसेंना आम्ही नगरपंचायतीमध्ये जागा दाखवली. विधानसभेत जागा दाखवली आहे.एकनाथ खडसे यांनी प्रत्येक वेळेस स्वतःच्या पक्षाशी गद्दारी केली. खडसे परिवाराला भाजपने मोठ मोठी पदे दिली. मात्र असे असतानाही त्यांचे झाले नाहीत. ३५ वर्षात खडसे मुक्ताईनगर मतदारसंघात काहीही करु शकले नाही.

एकनाथ खडसे हे अपघाती मंत्री होते, त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही धोबीपछाड देत आहोत . खडसेंना आम्ही नगरपंचायतीमध्ये जागा दाखवली. विधानसभेत जागा दाखवली आहे. एकनाथ खडसे यांनी प्रत्येक वेळेस स्वतःच्या पक्षाशी गद्दारी केली. खडसे परिवाराला भाजपने मोठ मोठी पदे दिली. मात्र असे असतानाही ते भाजपचे झाले नाहीत. ३५ वर्षात खडसे मुक्ताईनगर मतदारसंघात काहीही करु शकले नाही.

एकनाथ खडसे यांनी आपल्या फार्म हाऊसची ड्रोनद्वारे रेकी केल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर टीका केली. मला त्यांच्या बुद्धीमतेची कीव करावीशी वाटते. पायलट ट्रेनिंग कंपनीची विमान या मार्गाने जात असतात. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांना ड्रोनद्वारे रेकीची माहिती देण्यापूर्वी खडसेंनी अधिकाऱ्यांकडून कन्फर्म केलं पाहिजे होतं असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना खडसे कुटुंबीय फुगड्या खेळत होते. एकनाथ खडसे यांनी थाटात वाढदिवस साजरा केला, त्यावेळेस कुठे होते शेतकरी? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितीत केला. शेतकरी संकटात असताना खडसे कुटुंबीय फुगड्या खेळत होते अशी टीका पाटील यांनी केला.

खडसेंकडून पलटवार

खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. खडसे म्हणाले, माझ्यावर राजकीय गुन्हे वगळता साधी एक एनसीसुद्धा दाखल नाही. सराईत गुन्हेगार हे कुणाला म्हणतात तर चंद्रकांत पाटील यांच्यासारख्यांना म्हणतात. त्यांच्यावर ३०७ चे गुन्हे दाखल होते, तडीपारीची नोटीस तयार होती असा पलटवार खडसेंनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT