Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

खडसे समर्थकांकडून एक दिवस आधीच फटाक्यांचे बुकिंग

Sampat Devgire

सावदा : विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC election) आज मतदान होत आहे. त्यात माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) बाजी मारतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे (NCP) पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांनी फटाक्यांचे आगाऊ बुकींग देखील केले आहे. (Followers claimed Eknath khadse will win in MLC election)

दरम्यान श्री. खडसे यांचे अनेक समर्थक गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत, असे राजेश वानखेडे यांनी सांगितले.

श्री. खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने खानदेशात आणि विशेषत: तापी खोऱ्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि खडसे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. श्री. खडसे विजयी झाल्यास त्यांना मंत्रिपददेखील दिले जाईल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.

विधान परिषद निवडणुकीतील विजयाचा क्षण आपल्याला अनुभवता यावा, त्याचे साक्षीदार होऊन त्या जल्लोषात सहभागी होता यावे, यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते खडसे यांचा संभाव्य विजय साजरा करण्यासाठी मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, रावेर, सावदा या तापी परिसरातून रविवारी मुंबईकडे रवाना झाले.

यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, निवृत्ती पाटील, योगेश कोलते, सुनील नेवे भुसावळ, संदीप देशमुख, संजय चव्हाण, रमेश पाटील, सोपान पाटील, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे (सावदा), अतुल पाटील (यावल), राजेश पाटील (जळगाव), पंकज येवले, सय्यद अजगर, शेख कुर्बान, कैलास चौधरी (बोदवड), हेमराज चौधरी (फैजपूर), गोंडू महाजन (रावेर) आदींचा समावेश आहे.

फटाक्यांचे बुकिंग

विजय निश्चित आहे, असा या नेते, समर्थकांचा आत्मविश्वास आहे. खुद्द एकनाथ खडसे आणि त्यांच्या परिवारासह कार्यकर्ते यांनी या आत्मविश्वासाने मुक्ताईनगरला विजयाच्या जल्लोषाची तयारी केली आहे. त्यासाठी निकालाआधीच फटाक्यांचे आगाऊ बुकिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT