Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon DudhSangh Fraud Case: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार; गिरीश महाजनांनी दिले 'हे' संकेत

Eknath Khadse News: जळगाव जिल्हा दूध संघात पाच ते साडेपाच कोटींचा घोटाळा...

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon News: जळगाव जिल्हा दूध संघाच्या गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत मोठे संकेत दिले आहेत. जळगाव जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं महाजन म्हणाले आहेत.

मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या गैरव्यवहार प्रकरणावर मोठं भाष्य केलं. महाजन म्हणाले, जळगाव जिल्हा दूध संघाच्या (Jalgaon Dudh Sangh) बैठकीत जिल्हा दूध संघांचे अध्यक्ष व आमदार मंगेश चव्हाण यांनी संबंधित आजी आणि माजी सदस्यांना पैसे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. पैसे न भरल्यास नाईलाजास्तव दोन ते तीन दिवसांत गुन्हा दाखल करणार असल्याचंही मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.

शिळ्या कढीला ऊत, महाजनांचा ठाकरेंवर निशाणा

मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी मालेगावच्या सभेचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाजन म्हणाले, उध्दव ठाकरेंकडे दुसरे कुठलेही मुद्दे नाही, शिळ्या कढीला ऊत याप्रमाणे तेच तेच भाषण ठाकरे हे करत आहेत, खोटं बोलं पण रेटून बोलं असं चाललंय. लोक सभा ऐकायला गर्दी करतात, मात्र, ही गर्दी उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला आलेली नव्हती.आगामी काळात निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा काय आहे ते दिसेल असंही महाजन म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

जळगाव जिल्हा दूध संघात पाच ते साडेपाच कोटींचा हा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहेत. तसेच या प्रकरणी या आधीच एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांच्या समर्थक संचालक तथा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदा खडसे यांच्याविरोधात जळगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आणखी दुसरा गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. यामुळे एकनाथ खडसेंच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

पाच ते साडेपाच कोटींचा हा घोटाळा असून पैसे भरण्यासंदर्भात माजी सदस्यांना सांगण्यात आलं आहे. पैसे न भरल्यामुळे नाईलाजास्तव येत्या दोन ते तीन दिवसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT