ACB Action In Pune: बदली न करण्यासाठी मागितली लाच; पुणे महापालिकेचा आरोग्य निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

Anti Corruption Bureau Action : येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ACB Action
ACB Action Sarkarnama
Published on
Updated on

PMC News : पुणे महापालिकेच्या वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयातून बदली न करण्यासाठी आरोग्य निरीक्षकाने तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांच्या लाच मागितल्याप्रकरणी अटक केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) सोमवारी (ता. २७) ही कारवाई केली. सचिन धर्मा गवळी (वय ३४) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय मुकादमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ACB Action
Shahaji Patil News : आता नातवाचा निर्णय मान्य करायचा का? शहाजी पाटलांचा गणपतराव देशमुखांच्या नातवावर हल्लाबोल

पुणे महापालिकेच्या(PMC) नगर रोड (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन- आरोग्य विभागात सचिन गवळी हे आरोग्य निरीक्षक आहेत. तर, तक्रारदार हे त्याच कार्यालयात बिगारी मुकादम म्हणून काम करतात. आरोपी गवळी याने या क्षेत्रीय कार्यालयातून बदली न करण्यासाठी तक्रारदाराकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

लाचलुचपत विभागाने संबंधित तक्रारीची पडताळणी केली असता त्यात आरोग्य निरीक्षक गवळी याने स्वत: आणि वरिष्ठांसाठी लाच मागितल्याचे समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करून गवळी याला अटक केली.

ACB Action
Nana Patole News : नाना पटोले म्हणाले, आघाडी फुटणार नाही; कारण ‘तो’ विषय नव्हताच!

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com