Eknath Khadse News Rohini Khadse News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse News : नाथाभाऊंची भाजपात घरवापसी; मात्र कन्या रोहिणी खडसेंचा 'तुतारी' सोडण्याचा इरादा नाही...

कैलास शिंदे

Jalgaon News : भारतीय जनता पक्षाचे पुर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊंनी 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा नाथाभाऊंचा भाजपमध्ये घरवापसी होणार आहे. खडसे हे जरी भाजपात प्रवेश करणार असले तरी त्यांची कन्या ॲड. रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातच राहणार आहोत, असे ठरवले आहे. पवारांच्या पक्षातच थांबून आपण संघर्ष करणार आहोत, असा ठाम निर्धार राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी ‘सरकारनामा’शी संवाद साधताने म्हटले आहे. (Lok Sabha News 2024)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आपण लवकरच भारतीय जनता पक्षात घरवापसी करणार आहोत, अशी घोषणा आज केली. त्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ॲड. रोहिणी खडसे या सुद्धा वडिलांसोबत भाजपप्रवेश करणार काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. परंतु सायंकाळी ॲड. रोहिणी खडसे यांनी ट्वीट केले आहे. त्या म्हणाल्या, "आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत आहोत, मी याच पक्षात आहे. भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. यात त्यांनी तुतारी फुंकत असलेला आपला फोटोही जोडला आहे.

वडील भारतीय जनता पक्षात (BJP) घरवापसी करीत असतांना ॲड. रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबत असल्यामुळे पुन्हा राजकीय खळबळ उडाली आहे. याबाबत ॲड. रोहिणी खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, "आपण शरद पवार यांच्या सोबत त्यांच्या पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण यापुढेही याच पक्षात काम करणार आहे, पक्षात राहून संघर्ष करणार आहे, पक्षाच्या उमेदवारांसाठी तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राज्यात झंझावती दौरे करणार आहे. आज सकाळी पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेवून पक्षात राहण्याची आपली भूमिका त्यांना सांगितली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT