Eknath Shinde, Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse News : फर्दापूर रेस्ट हाऊसवर 'सुंदरी, मदिरा अन् मिनाक्षी'चे किस्से; महाजनांना खडसेंनी पुन्हा डिवचलं

Girish Mahajan News : माझ्यामागे 'ईडी' म्हणून महारजनांवर मोक्का : एकनाथ खडसे

सरकारनामा ब्यूरो

Eknath Khadse Attack on Girish Mahajan : जामनेर येथे शेतकऱ्यांच्या कापसाला तसेच इतर शेतमालाला भाव मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भेटी दिली. त्यावेळी त्यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी खडसेंनी फर्दापूर रेस्ट हाऊसवरील 'सुंदरी, मदिरा अन् मिनाक्षी'ची आठवण काढून महाजन यांना पुन्हा डिवचले.

यावेळी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज असल्यचाचे सांगितले. खडसे म्हणाले, "राज्यातील शेतकऱ्याचे अवकाळी व मान्सूनपूर्वी पावसाने मोठे नुकसान केले आहे. त्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची गरज आहे. मात्र सरकारविरुद्ध बोलले की कारवाई होते."

राज्य सरकार सूडाचे राजकारण करीत असल्याचा आरोपही खडसे यांनी केला. खडसे म्हणाले, "सरकारविरुद्ध बोलणाऱ्याच्या मागे 'ईडी', 'सीबीआय'ची चौकशी लावायाची. अशा स्वरूपाच्या चौकशा करून दडपशाही करण्याचे धोरण सत्ताधारी करीत आहे. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामागेही 'ईडी' लावण्यात आली आहे."

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ खडसे म्हणाले, "गिरीश महाजन यांनी माझ्या मागे ‘ईडी’ (लावली. मी असे काय केले की त्यामुळे माझ्यावर कारवाई करत आहेत? आज महाजन यांच्याकडे सत्ता आहे. त्या जोरावर ते दडपशाही करीत आहेत."

यानंतर त्यांनी महाजन यांच्यावर मोक्का का लावला याचेही कारण सांगितले. ते म्हणाले, "गिरीश महाजनांनी माझ्या मागे सर्वच यंत्रणा लावल्या. आता मला विचारतात माझ्यावर मोक्का का लावला? तुम्ही माझ्या मागे 'ईडी' (ED) लावली म्हणून तुमच्यावर मोक्का लावला. 'ईडी' आली नसती तर मोक्काही लावला नसता."

खडसे यांनी यावेळी जप्तीची नोटीस मिळाल्याचे सांगितले. ते म्हणाले, "मला कालच जप्तीची नोटीस मिळाली आहे. दोन वर्षांपूर्वी माझी प्रॉपर्टी ॲटेच करण्यात आलेली आहे. आता माझे काय जप्त करण्यात येणार आहे, हे मला माहित नाही. माझा मोबाईल जप्त करणार की घर जप्त करणार आहे? न्यायालयातून (Court) ही नोटीस मला कालच मिळालेली आहे."

यावेळी खडसे यांनी त्यांच्यावर कारवाई झाली म्हणून खंतही व्यक्त केली. तसेच फर्दापूर रेस्ट हाऊसमधील घटनेवरून महाजनांसह राज्य सरकारचा समाचारही घेतला. खडसे म्हणाले," माझ्यावर कारवाई का होत आहे, हे सुध्दा कळत नाही. मी काय चोऱ्या केल्या? फर्दापूरच्या रेस्ट हाऊसला गेलो, त्यावेळचे पेपर काढले तर सुरा आणि सुंदरी, मदिरा आणि मिनाक्षी यांचे किस्से ऐकायला मिळतील. अशा ठिकाण आपण नव्हतो, परंतु अशा ठिकाणी आपले मंत्री महोदय होते. मात्र त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT