Bullock Cart Race News : भाजप आमदाराच्या नावाने बैलगाडा शर्यतीचा धुरळा; पण बक्षिसाची गदाच गेली चोरीला

Bullock Cart Race : कल्याण पूर्वेतील खरड गावात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नावे आमदार केसरी बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती.
bullock cart race , Latest News
bullock cart race , Latest Newssarkarnama
Published on
Updated on

Kalyan-Dombivli News : कल्याण पूर्वेतील खरड गावात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नावे आमदार केसरी बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती. मात्र, बैलगाडा शर्यतीचा धुरळा (Bullock Cart Race) उडाला पण तो थोडा उशीराने. स्पर्धेच्या ठिकाणी अंधार झाला. या अंधाराचा फायदा घेत थेट मंचावरुन चोरट्यांनी आपला हात साफ करत तब्बल दहा ते बारा गदा चोरुन नेल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला.

पोलीस (Police) बंदोबस्त, आयोजकांची उपस्थितीत ही चोरी घडल्याने आयोजकांनी मंचावरून गदा चोर...ज्यांनी कोणी गदा चोरली असेल परत आणून द्या, असे आवाहन करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

bullock cart race , Latest News
K. Chandrasekhar Rao : मोठी बातमी : के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार...'या' दोन मतदारसंघांचा विचार सुरु

ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचा धुरळा रोज कोठे ना कोठे उडत आहे. मलंगगड परिसरात खरड गावात कल्याण पूर्वेचे भाजपचे (BJP) आमदार गणपत गायकवाड यांच्या नावे आमदार केसरी स्पर्धेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. काकडवाल गावातील निलेश कान्हा पावशे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

ही स्पर्धा उशीरा सुरु झाल्याने रात्री उशिरापर्यंत स्पर्धा सुरु होती. रात्रीचा अंधार पडल्याचा फायदा चोरट्यांनी घेत थेट मंचावरून बक्षिसांच्या रुपात ठेवलेली गदाच या चोरट्यांनी चोरुन नेली आहे.

bullock cart race , Latest News
Arvind Kejriwal Meets Sharad Pawar : देशाच्या राजकारणात शरद पवार सर्वार्थाने मोठे नेते; अडचणीच्या काळात त्यांच्या मदतीची गरज!

स्पर्धेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, आयोजक, कार्यकर्ते यांची उपस्थिती असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बक्षीस वितरणाच्या दरम्यान गदा चोरीला गेल्याची माहिती समोर आली. यानंतर आयोजकांनी गदा चोर म्हणत, ज्यांनी कोणी गदा चोरली ती परत आणून द्या, असे आवाहन करण्यास सुरुवात केली. मात्र, चोरटयांनी चोरलेल्या गदा परत केलेली नाही. याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बैलगाडा शर्यतीच्या मंचावरून दहा ते बारा गदा चोरीला गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, या बाबत अद्याप हिललाईन पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com