जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांनी आज जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी त्यांची मागणी आहे. (Eknath Shinde Latest News)
जळगाव जिल्हा दूध संघावर एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली संचालकांची सत्ता आहे. त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या संघाच्या चेअरमन आहे. संघात अधिकाऱ्यांनी सव्वा कोटी रूपयाचा लोणी व दूध भुकटीचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी केला आहे. या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबीत केल्याची माहितीही त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार चेअरमन मंदाकिनी खडसे व दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी शहर पोलीस ठाण्यात केली होती. मात्र पोलीसांनी आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे आज दुपारी चार वाजतापासून आमदार एकनाथ खडसे यांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कुणाच्या तरी दबावामुळे हा गुन्हा दाखल करीत नसल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तो पर्यंत आपण या ठिकाणाहून हलणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी ८ वाजेपर्यंत नाथाभाऊ हे पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनातच आहेत, असे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.