भुजबळ जातांना एकटे गेले पण येतांना पूर्ण राष्ट्रवादी अन् कॅाग्रेसलाही घेऊन आले...

Uddhav Thackeray : बाळासाहेबांचे जुने साथीदार आज आमच्या सोबत आहेत.
Uddhav Thackeray , Chhagan Bhujbal Latest News
Uddhav Thackeray , Chhagan Bhujbal Latest NewsSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ७५ व्या वाढदिवसाचा 'अमृत महोत्सव' सोहळा देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. हा सोहळा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला.

दरम्यान, या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलेच. मात्र याबरोबरच भुजबळ यांच्या संघर्षाचही कौतूक केलं. तसेच भुजबळ आज शिवसेनेत असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, असे मत व्यक्त करत भुजबळ हे आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून का असेना मात्र ते आमच्या सोबत आहेत. ते जातांना एकटे गेले मात्र येतांना राष्ट्रवादी आणि कॅाग्रेसलाही सोबत घेऊन आले, अशी मिश्किलपणे ते म्हणाले. त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला होता. (Uddhav Thackeray , Chhagan Bhujbal Latest News)

Uddhav Thackeray , Chhagan Bhujbal Latest News
झारखंड मुक्ती मोर्चाने धनुष्यबाण चिन्हावर महाराष्ट्रात निवडणूक लढवली तर चालेल का?

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजप आणि शिंदे गटाला चांगल्याच कोरखळ्या लगावल्या. ते म्हणाले, महाविकास आघीडी सरकार आपण यशस्वीपणे चालवून दाखवलं यामुळे पोटात गुब्बारा येणं स्वाभाविक आहे. त्यानंतर सरकार पाडून जे सुरू आहे. ते अजितदादांनी आणि थोरात साहेबांनी सांगितलच आहे. मात्र जुन्या काळात विधीमंडळ सभागृहाची उंची वेगळी होती.

मी स्वत: केशवराव धोंडगेंच भाषण एक-दोन वेळा गॅलरीत येऊन पाहिलं होतं. शिवसेनेची पहिली पोटनिवडणुक झाली तेव्हा वामनराव महाडिक त्यानंतर भुजबळ साहेब देखील एकमेव शिवसेनेचे आमदार होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शिवसेना प्रमुखांना फोन करून सांगितले. एकच माणूस आपण सभागृहात पाठवला पण तो बोलायला उभा राहिला की सर्व सभागृह स्तब्ध होऊन जात. हल्ली बघतोय मी तर कोण काय बोलतो काय बोलायचं कशाचा कशाला संबध नसतो. पुन्हा काय बोललं की हक्कभंगाचा प्रस्ताव जायचा आमच्या झिरवाळ साहेबांकडे त्यामुळे त्यावर मी काही बोलत नाही, असे म्हणतं त्यानी भाजपला टोला लगावला.

Uddhav Thackeray , Chhagan Bhujbal Latest News
छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते आता मुख्यमंत्री झाले असते...

ते पुढे म्हणाले की, सतत आणि सतत राजकारणाचा विचार करण्यापेक्षा राजकारणाने विचार करणं हे गरजेच आहे. मला पाहिजे सर्व पाहिजे आणि प्रतिस्पर्धी कुणी शिल्लकच उरला नाही पाहिजे. भुजबळ यांच एक चांगल उदाहरण आहे. त्यांचा राजकीय जन्म हा शिवसेनेत झाला. मात्र त्यांना त्यानंतर आयुष्यात काय करायचं होतं ते त्यांनी केलचं. तसेच त्यांनी जर शिवसेना सोडली नसती तर ते आता मुख्यमंत्री झाले असते,असंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. याबरोबरच ते म्हणाले की, जेव्हा भुजबळ बेळगावला ज्या प्रकारे गेले होते तो फोटो बघितल्यावर त्यांच्या पंच्चाहत्तरीच्या कार्यक्रमाला तुम्ही गेले त्यांनी तुम्ही हिदूत्व सोडलं,असा आरोपच केला जाईल, असा टोमणा देखील त्यांनी भाजपला लगावला.

Uddhav Thackeray , Chhagan Bhujbal Latest News
Chhagan Bhujbal : 'महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना पवारांची क्लिनचीट'

दरम्यान, फारुक अब्दूल्ला साहेब आल्याआल्या मला भेटले आणि मला म्हणाले की, वडिलांसारखं लढ. ही लढाई काय आपण सोडणार नाही. आणि सिब्बल साहेबांनी भुजबळांचा उल्लेख वादळ म्हणून उल्लेख केला. मात्र शिवसेनेने अनेक वादळ बघितली आहेत. मात्र त्यावेळी अनेक वादळ सोबतही होती. आणि न डगमगता उभे राहणारी वादळ आजही आमच्या सोबत असल्याचं त्यांनी पवारांकडे बघून सांगितले. असे असल्यामुळे मी लढाईचीच वाट बघतो. आज खुप आनंद वाटतो की, बाळासाहेबांचे जुने साथीदार आज आमच्या सोबत आहेत. ते जातांना एकटे गेले आणि येतांना पूर्ण राष्ट्रवादी आणि कॅाग्रेसलाही ते घेऊन आले, असे मिश्किलपणे उद्धव ठाकरे म्हणाले यावेळी मंचावरील नेते मंडळी आणि सभागृहात एकच हश्या पिकला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com