Girish Mahajan & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse : गिरीश महाजनांचा विरोध तरी संघाने खडसेंना बसवलं पुढच्या रांगेत, काय कारण?

Despite Girish Mahajan’s resistance, RSS gives Eknath Khadse a prominent role : महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघेही जळगाव जिल्ह्यातील आहेत.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघेही जळगाव जिल्ह्यातील आहेत. दोघेही नेते एकमेकांविरोधात आरोप -प्रत्यारोप करण्याची एकही संधी कधी सोडत नाहीत. खरेतर गिरीश महाजन यांना पुढे आणण्याचं काम एकनाथ खडसे यांनीच केलं. मात्र गेल्या काही वर्षांत खडसेंची अवस्था वाईट झाली आहे. याउलट महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे स्थान मिळवले आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांचे सातत्याने अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही खटके उडाले. हळूहळू दोघांमध्येही मोठा दुरावा निर्माण झाला. खडसेंचा स्पष्टवक्तेपणा, मुख्यमंत्रीपदाची असलेली महत्वाकांक्षा, भोसरीतील भूखंड प्रकरणी झालेले आरोप, तसेच दाऊद प्रकरणात जोडलं गेलेलं नाव यातून खडसे भाजपपासून पूर्णपणे दूरावले गेले. आता ते भाजपात पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र फडणवीस व महाजन या दोघांसोबत त्याचं असलेलं कट्टर वैर यामुळे त्यांचा प्रवेश रखडला आहे.

गिरीश महाजन यांचा खडसे यांना प्रंचड विरोध असला तरी जिल्ह्यातील संघाचे पदाधिकारी मात्र खडसे यांच्याविषयी आपुलकी बाळगून आहे. त्यांना खडसे यांच्या योगदानाची देखील जाणीव आहे, हे काल सिद्ध झालं. धरणगावातील संघाच्या कार्यक्रमात खडसेंना आमंत्रण देऊन आणि पुढच्या रांगेत बसवून संघाने त्यांच्यावरील प्रेम दाखवून दिलं.

खडसेंनी देखील आपण भाजपमध्ये नसलो तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मात्र आहोत असे सांगत धरणगावच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला आवर्जुन बोलावलं होतं हे खडसेंनी आवर्जुन सांगितलं. त्यांनी फडणवीस यांची भेट घेण्यासाठी देखील प्रयत्न केले. फडणवीस यांचे राजकीय भवितव्य पाहाता त्यांच्यासोबत चांगले संबंध असणे आवश्यक असल्याचं बहुतेक खडसेंना आता कुठं समजलं आहे. त्यातूनच ते फडणवीस यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

काल क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या पुतळा अनावरण समारंभाच्या कार्यक्रमात खडसेंच्या उपस्थितीचच चर्चा अधिक राहिली. या कार्यक्रमात त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत आपली औपचारिक का होईना पण भेट होईल अशी आशा होती. मात्र फडणवीस त्यांना न भेटताच निघून गेले. भाषणा दरम्यान फडणवीस यांना खडसेंच्या नावाचा उल्लेख करणंही टाळलं. त्यामुळे हा विषय राजकीय वर्तुळात चर्चिला गेला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT