Eknath khadse
Eknath khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

तशीही छळवणूक सुरूच आहे; चौकशी लावाच!

कैलास शिंदे :सरकारनामा ब्यूरो

जळगाव : नाथा भाऊची छळवणूक सुरूच आहे, त्याला आपण घाबरत नाही, आता जिल्हा बँकेच्या (District Bank Election) चौकशी बाबत विरोधक बोलत आहेत, त्यांनी आता ईडीची चौकशी लावावीच एक रुपयाचा भ्रष्टाचार सापडला तरी आपण राजकारण सोडून देऊ असा, सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना नाव न घेता लगावला आहे. जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीत सहकार पॅनल प्रचारात ते बोलत होते.

जळगाव येथील लेवा भवनात सहकार पॅनलच्या प्रचार सभेत ते बोलत होते, भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा बँक निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, आम्ही बँकेची चौकशी लावू अशी घोषणा केली. तोच धागा पकडून नाव न घेता या वेळी बोलताना खडसे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात जिल्हा बँक अत्यंत सुस्थित आणली आहे. देशातील दहा बँकात जिल्हा बँकेचा क्रमांक आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या चौकशीची कुणी घोषणा करीत असेल तर आपले आव्हान आहे, की त्यांनी बँकेची चौकशी जरूर लावावी. अशीही आपली छळवणूक सुरूच आहे, त्याला आपण घाबरत नाही.

अगदी जिल्हा बँकेची ईडीची चौकशी लावावी जर त्यात एक रुपयाचा भ्रष्टाचार सापडला तर आपण राजकारणातून निवृत्त होवू, जिल्हा बँकेला ५६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. आगामी काळात बँक शेतकऱ्यांच्या अधिक हितासाठी काम करेल त्यासाठी सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन खडले यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT