राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) लवकरच घरवापसी करणार असल्याचे निश्चित झाले आहे. खडसेंच्या भाजप (BJP) प्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar Lok Sabha constituency 2024) त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकनाथ खडसे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
खडसे हे गुजर पटेल समाजातील असून या समाजाचे मतदार नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे नंदुरबारमध्ये काँग्रेससह अन्य पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. त्यासाठी खडसेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
काही दिवसापूर्वी एकनाथ खडसे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी आले होते. खडसे आणि आमदार के. सी. पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक नेत्यांची भेटीगाठी घेतल्या होत्या. आता खडसे भाजपात जाणार असल्याने भाजप उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचार करणार का काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचार करणार हे लवकरच समजेल.
गेल्या दहा वर्षापासून नंदुरबार लोकसभेच्या खासदार असलेल्या आणि नंदुरबार लोकसभा भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांची विधानसभा निहाय बैठका सुरू आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील चार ही विधानसभा मतदार संघात गावित यांचा दौरा वाढला आहे. बुथप्रमुख आणि कार्यकर्त्यांचा बैठकीत दरम्यान गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन हिना गावित यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या उपस्थितीत लवकरच होणार असल्याची माहिती आहे. राज्यातल्या काही नेत्यांच्या विरोधानंतरही केंद्रीय नेतृत्व खडसेंना पक्षात घेण्यासाठी कसं राजी झालं याचं अनेकांना आश्चर्य वाटतंय. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी खडसेंच्या घरवापसीसाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न केल्याची चर्चा आहे. खडसेंच्या भाजपच्या प्रवेशानंतर त्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जाईल, अशीही चर्चा आहे.
(Edited by: Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.