Eknath Khadse News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics News : मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्य सरकारवर एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

Eknath Khadse News : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार टाळटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे, आसा आरोप खडसे यांनी केला

कैलास शिंदे

Jalgaon News : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार टाळटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. शासनाला हा प्रश्‍न चिघळवायचा असल्याचे दिसून येत असल्याचा गंभीर आरोप, राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला. तसेच लोकामध्ये संताप निर्माण होण्याअगोदर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून घटना दुरूस्ती करून हा प्रश्‍न तातडीने सोडवावा, अशी मागणिही त्यांनी केली.

जळगाव येथे माध्यमाशी बोलतांना ते म्हणाले, सरकारने मराठा आरक्षण प्रश्‍नासाठी तातडीने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) मांडली आहे. देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यांनी केंद्र सरकारला घटना दुरूस्ती करायला सावून मराठा समाजाला १५ टक्क्यांचे अधिक आरक्षण तातडीने द्यावे. मात्र, सरकारच त्याला या प्रश्‍नाला तरंगत ठेवून जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

अपात्रतेची सुनावणी लवकर घ्यावी

शिवसेनेच्या (Shivsena) १६ आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणी बाबत ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीची कालमर्यादा निश्‍चीत करावी, आणि त्या कालावधीतच निकाल द्यावा. मग ज्याला त्यावर अपील करायवयाचे असल्यास ते अपील करू शकतात. मात्र, केवळ सुनावणीला विलंब करण्यासाठी तारीख पे तारीख करण्यात येत असेल तर त्याला अर्थ राहणार नाही. मग शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गटच्या आमदारांची सुनावणी असे केल्यास त्याला विलंब लागून विधानसभेच्या निवडणुकाही होवून जातील त्यानंतर, मात्र सुनावणीला कोणताही अर्थ राहणार नाही.

भाजपला आता प्रोटोकॉल आठवला ?

जळगावात सरदार वल्लभभाई पटेल व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाबाबत भाजपने (BJP) राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलतांना खडसे म्हणाले, जिल्ह्यात रस्त्याचे, तसेच इतर उद्घाटन करतांना भाजपला कधीही आमदारांना, खासदारांना बोलवावे असे वाटत नाही. कोणीही मंत्री येतो आणि उद्घाटन करतो. त्यावेळी त्यांना हा मुद्दा का आठवत नाही. सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आनावरणात पूर्णपणे राजशिष्टाचार पाळला गेल्याचेही त्यांनी म्हटले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT