Marathwada Political News : देशात भाजपविरोधी `इंडिया`, आघाडी स्थापन झाल्यानंतर आता इंडिया ऐवजी `भारत` नाव वापरण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला. (Shivsena News) दिल्लीत झालेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या नावाखाली इंडियाऐवजी भारत असा उल्लेख करण्यात आला होता. यावरून भाजप आणि विरोधी पक्षामध्ये चांगलीच जुंपली आहे.
इकडे महाराष्ट्रातदेखील याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अमरावती येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी इंडियाचा भारत असा उल्लेख केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दानवे यांनी ट्विट करत फडणवीसांना टोला लगावतांना (India) इंडिया शब्दाची आपल्याला अॅलर्जी आहे हे तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला कळायला ७५ वर्षे लागली का? असा सवाल दानवे यांनी केला.
अमरावतीत तुम्ही इंडिया शब्दाची आपली खदखद व्यक्त केलीत. 'इंडिया' या शब्दाची आपल्याला अॅलर्जी आहे हे कळायला तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला ७५ वर्षे लागली देवेंद्र फडणवीसजी. (Marathwada) जग भारतीयांना 'इंडियन' म्हणून ओळखतात, त्यामुळे 'इंडिया' ही संकल्पना जगपरिचित आहे, हे माहीत असू द्या!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते 'वुई आर इंडियन्स, फर्स्टली अॅन्ड लास्टली`. मग त्यांच्या या महान संदेशातून तुम्ही 'इंडियन्स' शब्द काढणार आहात का? असा सवाल दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थितीत केला आहे. दानवे यांच्या टीकेनंतर भाजपकडून काय प्रत्युत्तर येते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.