Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातले निवडणूक प्रभारी ठरवले ; दमदार खांद्यांवर टाकला भार

Eknath Shinde Shiv Sena appointed Nivadnuk Prabhari : शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने 'निवडणूक प्रभारी' पदांवर नियुक्त्या घोषित केल्या.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २ डिसेंबर रोजी राज्यभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासाठी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक प्रभारी व स्टार प्रचारकांच्या नेमणुका जाहीर झाल्या आहेत. बुधवारी भारतीय जनता पक्षाने ४० जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्याच धर्तीवर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून निवडणुक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना (शिंदे गटाचे) सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी जिल्ह्यानिहाय यादी जाहीर केली आहे. नाशिकमधील चांदवड, पिंपळगाव बसवंत, ओझर, येवला, सटाणा, नगरपरिषदांसाठी आमदार सुहास कांदे, किशोर दराडे आणि माजी आमदार धनराज महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच मनमाड आणि नांदगाव नगर परिषदेसाठी आमदार सुहास कांदे यांचा या भागातील प्रभाव लक्षात घेता व तेथील आमदार असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह, सिन्नर, भगुर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषदेसाठी माजी खासदार हेमंत गोडसे आणि उपनेते विजय करंजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने फार आधीच हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचा भाग म्हणून आमदार सुहास कांदे यांच्याकडे यापूर्वीच जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुहास कांदे यांची 'प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख, नाशिक जिल्हा' या पदावर नियुक्ती केली आहे. स्थानिक निवडणुका लक्षात घेता शिवसेनेत प्रथमच अशाप्रकारच्या पदाची निर्मिती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव, भुसावळ, धरणगाव , नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणुक प्रभारी पदी गुलाबराव पाटील, भडगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव नगरपरिषद व शेदुर्णी नगरपंचायतीसाठी आमदार किशोर पाटील, चोपडा, फैजपूर, यावल,एरंडोल, पारोळा नगरपरिषदेसाठी आमदार चंद्रकांत सोनवणे, एरंडोल व पारोळा साठी आमदार अमोल पाटील, रावेर, सावदा नगरपरिषद व मुक्ताईनगर पंचायतीसाठी आमदार चंद्रकांत पाटील व अमळनेर नगरपरिषदेसाठी आमदार शिरीष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नंदुबार जिल्ह्यातील शाहदा, नंदुरबार, नवापूर व तळोदा नगरपरिषदेसाठी आमदार आमश्या पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार शिरीष चौधरी यांची नियुक्ती केली आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाई-वरवाडे, शिरपूर, पिंपळनेर, शिंदेखेडा नगरपंचायतीसाठी आमजार मंजुळा गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT