Eknath Shinde, Asha Worker Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde : साहेब, वाढदिवसाच्या शुभेच्छा, मात्र आमच्या मागण्या तेवढ्या मान्य करा!

Asha Workers Rally : मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आशा वर्करकडून मुख्यमंत्र्यांना हटके शुभेच्छा

Sampat Devgire

CM Eknath Shinde Birthday Wish :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे ठाण्यात जल्लोष आहे. शिवाय त्यांचे आमदार, मंत्री, समर्थक आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. अशातच राज्यातील आशा वर्कर म्हणजेच आशा महिला कर्मचारी त्यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

राज्यातील आशा वर्कर 12 जानेवारीपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत. या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर (Asha Worker) मुख्यमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी भेटून आणि गुलाबाचे फूल देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलावले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तीन तीन दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून आशा महिला कर्मचारी पायी निघाल्या होत्या. आज सकाळी ठाण्यात अंदाजे 30 हजार आशा वर्कर पोहोचल्या असून, त्या पाऊण लाख गुलाबाची फुले देऊन त्यांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस त्यांचे समर्थक राज्यभरात फ्लेक्स आणि जाहिराती करून साजरा करत आहेत. त्यांचे समर्थक तसेच राजकीय क्षेत्रातील विविध नेते त्यांना शुभेच्छा देऊन हा वाढदिवस साजरा करतील. मात्र, आशा कर्मचाऱ्यांकडून (Health Worker) होणारा हा मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आगळावेगळा ठरण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

3 महिन्यांपूर्वी निर्णय, अंमलबजावणी नाही

तीन महिन्यांपूर्वी आरोग्यमंत्री आणि सचिवांसोबत झालेल्या बैठकीत आशा कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी आणि त्यांना दिवाळी बक्षीस देण्यात यावी, यावर एकमत झाले होते. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली होती; पण त्याबाबतचा आदेश अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना लाभ मिळालेला नाही. यासाठी त्यांचे बेमुदत संप आणि आंदोलन सुरूच आहेत.

यासंदर्भात नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्यातदेखील या कर्मचाऱ्यांनी काळाराम मंदिरामध्ये आरती आणि प्रार्थना करून पंतप्रधानांचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला आंदोलन केल्याने या संघटनेचे नेते राजू देसलेंना पोलिसांनी मध्यरात्री अटक करून दिवसभर कारागृहात डांबले होते. कायदा पायदळी तुडवून केलेल्या या कारवाईच्या विरोधात संबंधित पोलिस निरीक्षकावर कारवाई करावी, अशी या संघटनेची मागणी आहे.

हे सर्वजण गेले तीन दिवस पायपीट करून ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहाेचले आहेत. यात संघटनेचे नेते राजू देसले, सुवर्णा मेतकर, माया घोलप, अर्चना गडाख, प्रतिभा कर्डक, सुनीता गांगुर्डे, सविता हगवणे, कांचन पवार, सुनीता कुलकर्णी, समीरा शेख आदींसह विविध पदाधिकारी या आंदोलनात आघाडीवर आहेत.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT