Parnita ponkshe at Nandurbar Meeting
Parnita ponkshe at Nandurbar Meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde News; शिंदे गटाच्या झंजावाताने शिवसेना अलर्ट!

Sampat Devgire

नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्याला तोड नाही. त्यामुळे कोणीही ऊठसूट कितीही काहीही टीकाटिप्पणी, आरोप-प्रत्यारोप केले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. अशा आरोपांनी डगमगतील असे आपले नेते नाहीत, असे प्रतिपादन बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या (Shivsena) जिल्हा संपर्कप्रमुख पर्णिता पोंक्षे (Parnita ponkshe) यांनी केले. (Eknath shinde Group have start a political drive in Nandurbar district)

नगर परिषदेच्या सभागृहात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आणखी काही दिवस श्रीमती पोंक्षे जिल्ह्यात विविध तालुक्यांत जाऊन मेळावे व संपर्क मोहीम राबविणार आहेत. त्यांचे टार्गेट शिवसेना (उद्धव ठाकरे गट) असल्याने शिवसेनेचे नेते सावध झाले आहेत.

मंगळवारपासून सहा दिवस पोंक्षे नंदुरबार जिल्ह्याच्या दौरावर आहेत. नवापूर, तळोदा, धडगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. या वेळी पोंक्षे म्हणाल्या, की महिलांनी त्यांच्या अधिकाराबद्दल जागृत राहणे महत्त्वाचे आहे. महिलांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने शक्ती कायदा पारित केला आहे. या कायद्याचा वापर महिलांना करता आला पाहिजे. जोपर्यंत पीडित समस्याग्रस्त महिला तक्रार करत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी कोणी उभे राहू शकत नाही.

बैठकीच्या सुरवातीला नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी पोंक्षे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. बैठकीत जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. या वेळी पंचायत समिती सभापती माया माळसे, उपसभापती शीतल परदेशी, जिल्हा परिषद सदस्या शकुंतला शिंत्रे, जागृती मोरे, नगरसेविका सोनिया राजपूत, भारती राजपूत, मनीषा वळवी, ज्योती योगेश राजपूत, ज्योती पाटील, कुरेशी फहमिदाबानो रियाज, श्रीमती मेमन मेहरुंनिसा अ. गनी, पंचायत समिती सदस्या बायजाबाई भिल, बेगाबाई भिल, दीपमाला पाडवी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT