Shivsena leader Anant Gite Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anant Gite; शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्यांना मातीत गाडा!

शिवसेना संपविण्यासाठी राज्यात सत्तेचा प्रयोग झाला मात्र भाजपमुळेच शिंदे सरकारही पडेल!

Sampat Devgire

धुळे : (Dhule) राज्यात (Maharashtra) शिवसेना (Shivsena) संपविण्यासाठीच सत्तेचा प्रयोग झाला. यात भाजपमुळे (BJP) शिंदे (Eknath Shinde) -फडणवीस (Devendra Fadanvis) सरकार पडेल, असे भाकीत करताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते (Anant Gite) यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्यांना मातीत गाडा, असे आवाहन शिवगर्जना अभियानांतर्गत येथील केले. (Shivsena leader Anant Gite Appeal to Finish all rebels from politics)

शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे राज्यात शिवगर्जना अभियान सुरू झाले आहे. सोमवारी धुळे शहरात शिवसेना कार्यकर्त्यांकडून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी श्री. गिते यांनी मार्गदर्शन केले.

श्री. गिते म्हणाले, की राज्याच्या राजकारणात ज्यांना राजकीय वारसा नव्हता, अशा उपेक्षित वर्गाला शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी चेहरा दिला. पानटपरी चालविणाऱ्यापासून रिक्षाचालकापर्यंतच्या सामान्यांना सत्तेच्या शिखरावर बसविले.

मात्र, त्याच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर २५ वर्षे ज्यांना राज्याच्या कान्याकोपऱ्यापर्यंत शिवसेनेने सत्ता बहाल केली, अशा अविश्‍वासू भारतीय जनता पक्षाच्या नादी लागून शिवसेनेमध्ये बंडखोरी करत ५३ गद्दार बाहेर पडले.

राज्याच्या विकासाऐवजी त्यांना सांभाळण्याचा एककलमी कार्यक्रम भाजप राबवीत आहे. गद्दारांना येत्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत अद्दल घडविण्यासाठी शिवगर्जना संवाद यात्रा सुरू झाली आहे. सर्वांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार करा. जनसेवेचे व्रत कायम सुरू ठेवा, अशी साद श्री. गिते यांनी घातली.

यावेळी प्रियंका जोशी, तालुकाप्रमुख नाना वाघ, संपर्कप्रमुख धात्रक, श्रीमती घाडी, श्री. औटी, श्री. सरदेसाई यांनीही मार्गदर्शन केले. पक्षाच्या उपनेत्या व प्रवक्त्या संजना घाडी, विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, जिल्हा संपर्कप्रमुख अशोक धात्रक, जिल्हा महिला संपर्कप्रमुख उषा मराठे, उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख शुभांगी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

विविध नेत्यांचा प्रवेश

मेळाव्यात विविध पक्ष-संघटनेच्या प्रतिनिधींचा प्रवेश सोहळा झाला. यात सफाई आक्रोश मोर्चाचे अध्यक्ष व वाल्मीकी समाजप्रमुख लक्ष्मण चांगरे, अखिल भारतीय सफाई कर्मचारी कल्याण संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद जावडेकर, सफाई कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश विसनारिया, धुळे शहरातील मुस्लिम समाजाचे जावेद बिल्डर, भीम कायदा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद शिंदे, देवपूर परिसरातील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते इरफार मनियार, असगर बाबा, मोहम्मद सलीम अन्सारी, मोहम्मद मेहमूद खान, मोहम्मद सलीम शेख, निवृत्त अभियंता साळुंखे आदींचा समावेश आहे. मेळाव्यापूर्वी युवा सेनेने शक्तिप्रदर्शन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT