Pachora Shivsena News : माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज जळगाव येथील पिंप्राळा (पाचोरा) भागात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जागेचे भूमिपूजन करतील. त्यानंतर त्यांची पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेची मोठी तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील काहीही म्हणत असले तरीही शिंदे गटाच्या आमदारांनी ठाकरेंच्या दौऱ्याचा धसका घेतल्याची चर्चा आहे. (CM Eknath Shinde Group`s MLA kishor patil scare Thackeray visit)
शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा प्रामुख्याने शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांच्या मतदारसंघात आहे. त्याचे आयोजन आमदारांच्या भगीनी व राजकीय प्रतिस्पर्धी वैशाली सुर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांनी केले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील उद्धव ठाकरे यांचा दौरा व सभा याविषयी काहीही विधाने करीत असले तरी ही सभा शिंदे गटाचे आमदार पाटील यांना इशारा देणारी ठरेल हे मात्र नक्की. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी एकुणच या दौऱ्याबाबत अत्यंत सावध प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. आम्हीही ठाकरे यांचे स्वागतच करू असे त्यांनी यापूर्वी म्हटले होते, हे विशेष.
श्री. ठाकरे मुंबई येथून विमानाने जळगाव विमानतळावर सकाळी अकराला येणार आहेत. त्यानंतर मोटारीने ते पाचोरा येथे रवाना होतील. त्याअगोदर सकाळी साडेअकराला जळगावातील पिंप्राळा येथे महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ते पाचोरा येथे रवाना होतील. पाचोरा येथे जाहीर सभा व माजी आमदार (कै.) आर. ओ. तात्या पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल.
पिंप्राळ्यात जोरदार तयारी
पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त पिंप्राळा येथे कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही तयारी सुरू आहे. या ठिकाणी व्यासपीठही उभारण्यात आले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पिंप्राळा येथे कार्यक्रमास्थळी भेट देत पाहणी केली. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.