Uddhav Thackeray News: खेड, मालेगावनंतर ठाकरेंची तोफ आता पाचोऱ्यात धडाडणार; शिंदे गटाच्या नेत्यानं दिला 'हा' इशारा

Jalgaon Political News : शिंदे गटाला शह देण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शनाचं ठाकरे गटाचं नियोजन...
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : एकनाथ शिंदेंसह आमदार, खासदारांच्या बंडखोरीनंतर दुभंगलेल्या पक्षाच्या नव्याने बांधणीसाठी उध्दव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. इतर पक्षातील नेत्यांच्या पक्षप्रवेशासह जाहीर सभांचा धडाका लावला आहे. एकीकडे महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात वज्रमूठ सभेद्वारे शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात असतानाच दुसरीकडे ठाकरे यांनी देखील जाहीर सभा घेत शिंदे गटासह भाजपचा समाचार घेतला जात आहे.

आता खेड, मालेगाव येथील सभेनंतर आता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे रविवारी(दि.२३) सायंकाळी ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.

Uddhav Thackeray News
Sanjay Raut News : सत्ता अन् पैशांच्या जोरावर धमक्या देणाऱ्यांना घाबरत नाही; संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांना टोला

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच जळगाव दौऱ्यावर येत आहेत. यामुळे ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकीकडे शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर जळगावमधील चार आमदार शिंदे गटाची वाट धरली. तसेच गुलाबराव पाटलांकडून ठाकरे गटावर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी ठाकरे गटानं कंबर कसली आहे.

शिवसेनेत फूट पडली तेव्हा पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, पारोळ्याचे चिमणराव पाटील, जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील, चोपड्याच्या लताबाई सोनवणे, मुक्ताईनगरचे तत्कालीन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. आमदार किशोर पाटील पहिल्यापासून शिंदे यांच्यासोबत राहिले आहेत.

Uddhav Thackeray News
Radhakrishna Vikhe Patil:''...पण आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीसच!''; अखेर राधाकृष्ण विखेंच्या मनातलंही आलं ओठावर

शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचेही अनावरण करण्यात येणार आहे. माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी सभेचे आयोजन केले आहे.

ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाला शह देण्यासाठी स्थानिक पातळीवर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे नियोजन आहे. या सभेकरता पाचोऱ्यात ठिकठिकाणी बॅनरबाजी आणि भगवे झेंडे संपूर्ण पाचोरा शहरात ठाकरे गटाकडून लावण्यात आले आहेत. सभेपूर्वीची वातावरण निर्मिती ठाकरे गटाकडून करण्यात आली असून सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत आणि जळगावचे पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युध्द रंगलं आहे.

Uddhav Thackeray News
Maharashtra Politics: राजा तणावात राहणार..; भेंडवळच्या घटमांडणीत महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य

आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोकं...

उद्धव ठाकरे यांच्या सभेला कुणीही विरोध केलेला नाही. आर ओ तात्यांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला कुणीही विरोध केलेला नाही. आर ओ तात्या आमचे जीवलग मित्र होते. ते आमच्या प्रत्येक सुख-दु:खात येणारे होते. त्यांच्या पुतळाच्या कार्यक्रमादरम्यान संजय राऊत नेहमी वेगळं वक्तव्य करत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे हे जे नतद्रष्ट लोकं आहेत, ज्यांनी शिवसेनेची वाट लावली त्यांना आमचा विरोध आहे.आमचा त्यांना विरोध आहे. ते आजही गुलाबी गँग बोलले. त्यांना सगळं बोलायची मुभा आहे का? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.

राऊत कोणत्याच आंदोलनात नव्हते. शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे त्यांना माहिती नाही. चौकटीत बोलानंतर आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोकं आहोत. त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करु नये. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

Uddhav Thackeray News
Amritpal Singh Surrender: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगची पंजाबमध्ये शरणागती; 'हे' आहे कारण?

राऊत काय म्हणाले?

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊतांनी उध्दव ठाकरेंच्या पाचोरा येथील सभेअगोदर वातावरण तापवत गुलाबरवा पाटलांना डिवचलं आहे. राऊत म्हणाले, जळगाव आमचा आहे. शिवसेनेचा आहे. जळगावात आम्ही घुसलो आहे. काल आम्ही शोधत होतो. कोणता उंदीर घूसलाय का? गुलाबराव पाटील म्हणजे गुलाबो गँग असे राऊत म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com