Eknath Shinde with Shivsena MLA, Eknath Shinde News in Marathi sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अखेर कन्फर्म झालं...एकनाथ शिंदेंसोबत ३७ आमदार, ठाकरे सरकार पडणार?

एकनाथ शिंदे यांनी पक्षापुढे भाजपशी युतीची अट टाकल्याने पक्षापुढे संकट.

Sampat Devgire

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत 37 आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्री. शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी काही महत्वाच्या अटी ठेवल्या आहेत. त्या अटी पाहता राज्यातील ठाकरे सरकार पडण्याचीच (Mahavikas Aghadi Government) शक्यता दिसू लागली आहे. (Mahavikas Aghadi government may collapse)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांच्यासमवेत ३७ आमदार असल्याचा दावा केला जात होता. प्रत्यक्षात तेव्हढे आमदार त्यांच्यासमवेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा गट टिकल्यास राज्यातील सरकार अल्पमतात येईल. त्यामुळे सरकारचे अस्तित्व धोक्यात येईल. व्हायरल झालेल्या छायाचित्रात ३५ आमदार दिसत आहेत. काँग्रेसचे चार आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Eknath Shinde News in Marathi)

दरम्यान सूरतमध्ये श्री. शिंदे असलेल्या हॅाटेलमध्ये राजकीय हवा गरम होती. मंगळवारी दिवसभर विविध घडामोडी घडल्या. प्रहार संघटनेचे नेते व राज्याचे मंत्री बच्चू कडू हेदेखील त्यांच्यासमवेत आहेत. मंत्री कडू त्यांच्या समवेत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

श्री. शिंदे यांच्या समवेत असलेल्या आमदारांचा व्हीडीओ आणि फोटो देखील व्हायरल झाला आहे. त्यात आमदार पत्रावर सह्या करीत असल्याचे दिसते. त्यातून श्री. शिंदे वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. राजकीय घडामोडी पाहता एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आज राजभवनकडे पत्र रवाना करतील अशी शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या समवेत असलेल्या आमदारांत केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांचा ससेमीरा मागे लागलेल्या आमदारांचा समावेष आहे. त्यात प्रताप सरनाईक, यामिनी जाधव हे प्रमुख आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या समवेत श्रीनिवास वनगा, अनिल बाबर, नितिन देशमुख, लता सोनवणे, संजय शिरसाट, महेंद्र दळवी, भारत गोगावले, प्रकाश सुर्वे, सुहास कांदे, बच्चू कडू, नरेंद्र बोंडेकर (अपक्ष), संजय गायकवाड, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरनारे, चिमणराव पाटील, किशोर पाटील, नितीनकुमार तळे, संदीपान भुमरे आणि महेंद्र थोरवे आहेत हे स्पष्ट झाले आहे. ही संख्या लक्षात घेता, राज्य सरकार अल्पमतात आल्याचे स्पष्ट झाले.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT