shivendraraje Bhosale
shivendraraje Bhosalesarkarnama

लवकरच फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येणार... शिवेंद्रसिंहराजे

मध्यवर्ती निवडणुकांची Election सध्यातरी चर्चा नाही. पक्षाच्या बैठकीत कोणीही सुतोवाच केलेले नाही. मात्र, अस्थितरतेची परिस्थिती राहिली, तर पक्षाने सूचना केल्यास आम्ही तयार आहोत, असेही शिवेंद्रसिंहराजे shivendraraje Bhosale म्हणाले.
Published on

सातारा : महाराष्ट्रात लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत यावे, यासाठीच्या हालचाली कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाल्या आहेत, असे खळबळजनक विधान भाजपचे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना व काँग्रेसची मते फोडली. त्यातूनच त्यांच्या पाच जाग निवडून आल्या. आता शिवसेनेचे नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते सध्या नॉट रिचेबल आहेत. सध्या ते सुरतमध्ये असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे १७ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. एकुणच शिवसेनेतील नाराजी उफाळून आलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपकडून या संधीचे सोने करण्याची तयारी सुरू आहे. त्याबाबत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

shivendraraje Bhosale
दोन राजेंना सत्तेबाहेर करण्याचा शिंदेंचे निर्धार : 'सातारा शहर महाविकास आघाडी' मैदानात

एकनाथ शिंदेंसह सातारा जिल्ह्यात महेश शिंदे व शंभूराज देसाई हे सध्या नॉट रिचेबल आहेत. याविषयी विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, या गोष्टी न्यूजच्या माध्यमातून ऐकल्या आहेत. मुळात हा दुसऱ्या पक्षांचा विषय आहे, त्यांच्या प्रमुख नेत्यांनी याची माहिती देणे गरजेचे आहे.

shivendraraje Bhosale
Eknath Shinde Live Update : शिंदे यांना ४० आमदारांचा पाठिंबा : भूमिकेवर ठाम!

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार लवकरात लवकर यावे त्याची सुरवात कालच्या विधान परिषद निवडणुक निकलापासून सुरू झाली आहे. मध्यवर्ती निवडणूका लागतील का या प्रश्नावर ते म्हणाले, मध्यवर्ती निवडणुकांची सध्यातरी चर्चा नाही. पक्षाच्या बैठकीत कोणीही सुतोवाच केलेले नाही. मात्र, अस्थितरतेची परिस्थिती राहिली, तर आम्ही पक्षाने सूचना केली तर आम्हीही मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार आहोत, असेही आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com