Nashik Simhastha News: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधू आणि आखाड्यांना भोजन देण्याची केलेली घोषणा चर्चेत आली आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंतांच्या भोजनाची जबाबदारी शिवसेना (शिंदे गट) उचलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र, कुंभमेळ्यात साधू आणि आखाडेच भाविकांना अन्नदान करतात, अशा पार्श्वभूमीवर या घोषणेवर काही साधू-महंतांनी प्रश्न उपस्थित केल्याचे समजते. त्यामुळे शिंदे यांच्या घोषणेमागे नेमका विचार काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण येत्या 31 ऑक्टोबरला होत आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते हा उपक्रम होईल. त्यासाठी कार्यक्रमांची लगबग सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे आनंदकुंभ संत संमेलनाला हजेरी लावली. आखाड्यांच्या प्रतिनिधींच्या या संमेलनात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू आणि आखाडे यांना भोजन देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली. येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यात ही जबाबदारी शिवसेना शिंदे पक्ष उचलणार आहे. त्याबाबत कुठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
उत्साहात केलेल्या या घोषणेची साधू आणि महतांमध्ये चांगलेच चर्चा आहे. अनेक साधुंनी या घोषणेबाबत खंत व्यक्त केली. कुंभमेळ्या विषयी अज्ञान आणि राजकीय उत्साहातून ही घोषणा झाली असावी अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
मुळात कुंभमेळ्यासाठी येणारे साधू हेच भाविकांना भोजन आणि दान करण्यासाठी येतात. साधू ग्राम मध्ये विविध संस्था आणि आखाडे तसेच खालचा तिन्ही पर्वण्या होईपर्यंत भंडारा चालवतात. त्यात भाविकांना रोज आवर्जून आणि आग्रहाणे भोजन दिले जाते.
कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधुंना भोजनासह दक्षिणाही दिली जाते. ही कुंभमेळ्यातील नियमित प्रथा आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी उत्साहात अन्नदान देणाऱ्या साधू आणि आखाड्यांनाच भोजन देण्याची घोषणा केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
यासंदर्भात सिंहस्थ कुंभमेळा आखाडा परिषदेचे प्रतिनिधी महंत भक्ती चरणदास यांनी अशी घोषणा करण्याआधी आखाडे आणि खालसा यामध्ये किती साधू आणि नागा आहेत याची माहिती तरी घ्यायला हवी होती. त्यानंतर घोषणा करायला हवी होती. शासनातर्फे सार्वजनिक पुरवठा विभागाकडून धान्य देण्याची मागणी होत असते. आखाड्यांना भोजन देण्याची घोषणा आजवर कधीही झाली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.