Eknath Shinde & Sanjay Sawant
Eknath Shinde & Sanjay Sawant Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले, तरी आमचे नाहीत!

Sampat Devgire

जळगाव : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले, म्हणून त्यांचे अभिंनदन. मात्र, ते शिवसेनेचे (Shivsena) मुख्यमंत्री नाहीत. आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री जाहीर करतात. भारतीय जनता पक्ष (BJP) आमचे प्रतोद नाहीत. त्यांनी मुख्यंमत्री जाहीर करावा, ही संपूर्ण भाजपची खेळी आहे, असा सणसणीत टोला शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी लगावला. (Shivsena is firm on tommarow`s agaitation against Shivsena rebel)

भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित केले आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. शिवसेनेची ही कोंडी करण्यात आली काय, असा प्रश्‍न यामुळे निर्माण झाला आहे. जळगाव जिल्ह्यात आलेले शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की भारतीय जनता पक्षाची ही खेळी आहे. हा पक्ष उदार मतवादी केव्हापासून झाला, असा प्रश्न त्यांनी केला.

ते म्हणाले, भाजप आपले सत्तेचे ताट दुसऱ्याला देईल काय?. नेमकी यामागे काय खेळी, हे आगामी काळात दिसून येईल. मात्र, एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ते योग्य नाही. कारण शिवसेनेचा मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख जाहीर करतात. भारतीय जनता पक्ष काही आमचा प्रतोद नाही, की ते जाहीर करू शकतात.

शनिवारी मोर्चा निघणारच

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा निषेध करण्यासाठी जळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे शनिवारी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत संजय सावंत म्हणाले, की, आमचा हा मोर्चा निघणारच आहे. या मोर्चात जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून देऊ.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT