आदित्य ठाकरेंसह 14 आमदारांना शिंदे गटाचा इशारा; आमचा व्हिप पाळला नाही तर...

Uddhav Thackeray|Deepak Kesarkar: उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला ही आमच्यासाठी दु:खाची गोष्ट आहे.
Eknath Shinde News, Deepak Kesarkar Latest News, Shivsena News, Aditya Thackeray News
Eknath Shinde News, Deepak Kesarkar Latest News, Shivsena News, Aditya Thackeray Newssarkarnama

Aditya Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट नसून दु:खाची गोष्ट आहे आणि याला कॅाग्रेस, राष्ट्रवादी कॅाग्रेस व तितकेच संजय राऊत (Sanjay Raut) जबाबदार आहेत.

आम्ही ठाकरे यांना लवकर निर्णय घेण्यासाठी सांगत होतो. मात्र, त्यांनी वेळ लावला. त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले आहे. आजही आम्ही शिवसेनेतच असून आमच्यासोबत न आलेले आमदार आणि आम्ही वेगळे नाहीत. मात्र, त्यांच्याबाबतचा निर्णय आता एकनाथ शिंदे घेतील, अश्या शब्दात बंडखोर शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली.(Deepak Kesarkar Latest News)

Eknath Shinde News, Deepak Kesarkar Latest News, Shivsena News, Aditya Thackeray News
Beed : फडणवीस जिल्ह्याबाबत पत्ता टाकतांना लोकसभेसह इतर निवडणुकांचाही विचार करणार?

केसरकर म्हणाले, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून सातत्याने शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला गेला जात होता. यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. ठाकरेंनी आमच्या तक्रारी न ऐकता त्यांनी पवारांचं जास्त ऐकलं त्यांना आमच्यापेक्षा पवार जवळचे वाटले. मात्र, पवार आमचा पक्ष कश्याला वाढवतील, असा सवालही केसरकरांनी ठाकरेंना विचारला.

आम्ही ठाकरे यांना सांगत होतो मात्र, त्यांनी आमचं ऐकलं नाही. त्यात संजय राऊतांमुळे आमच्यात आणि ठाकरे यांच्यात दरी वाढतच गेली. त्यामुळे हा परिणाम झाला. आम्ही कुणीही त्यांचा राजीनामा मागितला नाही मात्र, पवारांनी आमच्यावरच कारवाई करण्याची कायदेशीर लढाई सुरू केली. कोण जवळचे पवार की शिवसैनिक? हा विचार उद्धव साहेबांनी करावा. आमचा लढा शिवसेनेच्या आस्तित्वासाठी आहे. संभाजीनगर या नामांतरासाठीही आम्ही बोलल्यावर हे झालं, असा टोलाही त्यांनी लगावला.

Eknath Shinde News, Deepak Kesarkar Latest News, Shivsena News, Aditya Thackeray News
पुण्याचे पालकमंत्रीपद अजितदादांकडून चंद्रकांतदादांकडे येणार !

शिवसेनेचे ठाकरेंकडे असलेल्या १४ आमदारांबाबत बोलतांना केसरकर म्हणाले की, शिवसेनेतील १४ आमदार आणि आम्ही वेगळे नाही, आमचा गट एकच असेल. आता पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आमचा व्हिप पाळला नाही तर त्यांना अपात्र करायच की नाही हे एकनाथ शिंदे ठरवतील, असा इशाराच केसरकरांनी दिला आहे.

दरम्यान, शिवसेना आणि आमच्यातील दरी कमी होऊ शकते मात्र, संजय राऊत मधे असतील तर ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणे अवघड असल्याचे केसरकर म्हणाले. आम्ही ठाकरेंना आमच्यासोबत बोलवू, तेच आमचे नेते आहेत. मात्र, आम्हाला जर कुणी डुक्कर, कुत्रा म्हणत असेल किंवा आमच्या आई, बहीणींना शिव्या देत असेल तर कसे आम्ही त्यांच्यासोबत राहू, असा सवाल केसरकरांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com