Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shinde Gat : ठाकरे गटाला घेरणार! मुंबई, ठाण्याच्या धर्तीवर शिंदे गटाचा नाशिकमध्ये बिग प्लॅन

Eknath Shinde Shiv Sena Big Plan In Nashik To Tackle Thackeray Group : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची तयारी जोरदार सुरू आहे...

सरकारनामा ब्यूरो

अरविंद जाधव-

Maharashtra Politics Latest News : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिंदे गट शिवसेना हे आपल्यापरीने कार्यकर्त्यांना जमवणे आणि आहे त्या कार्यकर्त्यांची तटबंदी करणे याकडे लक्ष ठेवून आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (शिंदे गट) 31 प्रभागांत 122 शाखांचा विस्तार करण्याचे काम सुरू केले आहे. या महिन्याच्या अखेरीस पक्षाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला असेल, असे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.

शिवसेना पक्षाची ताकदच संघटन असून त्याचा मार्ग शिवसेनेच्या शाखांमधून जातो. फक्त शाखांचे फलक लावणे हा आमचा उद्देश नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शाखांची ताकद वाढवली. मुंबई आणि ठाण्यामध्ये आमदारही शाखांवरच थांबतात, हेच चित्र नाशिकमध्ये निर्माण होत असल्याचे बोरस्ते यांनी स्पष्ट केले.

वॉर्ड तेथे शाखा या पद्धतीने शाखा कार्यरत होतील. सेवा, संस्कृती आणि सुरक्षा या त्रिसूत्रीवर शाखांचे काम चालेल. शाखाप्रमुख आणि उपप्रमुखांसह ११ सदस्यांची प्रत्येक शाखेत नियुक्ती करण्यात येत आहे. ही शाखा त्या वॉर्डसाठी नगरसेवकाइतकीच महत्त्वाची ठरेल, याकडे आमचे लक्ष असल्याचे बोरस्ते म्हणाले. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व शाखा कार्यान्वित होतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शिंदे आणि ठाकरे गटातील फुटीचा परिणाम राज्यात जसा झाला तसा तो नाशिक शहरामध्ये तेवढा झाला नाही. वर्षानुवर्षे उद्धव ठाकरे यांच्यासाठी कार्यरत असलेला मोठा गट आजही कायम आहे. संजय राऊत, सुधाकर बडगुजर यांच्यामार्फत ठाकरे गटाची शहरातील पकड मजबूत ठेवण्यात तूर्तास पक्षाला यश मिळाले आहे.

ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना मागील महिन्यात कायदेशीर प्रक्रियेला समोरे जावे लागले. या प्रकरणांची चौकशी सध्या सुरू आहे. दुसरीकडे शिंदे गटाने मात्र उचल खाल्ली असून शाखांच्या विस्ताराबरोबर जास्तीत जास्त शिवसैनिकांना सोबत घेण्याचा प्रयत्न स्थानिक नेत्यांकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT