Shivsena Eknath Shinde agitation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: खड्डे प्रश्नावर शिवसेना शिंदे पक्षाला उशिरा जाग, त्यातही जखम डोक्याला आणि मलम पायाला!

Eknath Shinde Shiv Sena party woke up,Protest over pothole issue, even during the protest, gap between leaders and workers -एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचतात शहरातील खड्डे प्रश्नावर कार्यकर्त्यांनी केले जोरदार आंदोलन

Sampat Devgire

Shivsena Eknath Shinde News: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाचा बूथ प्रमुखांचा मेळावा झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. सक्रिय होण्याचे आदेश दिल्याने त्याचा परिणाम दिसून आला.

शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. यात असंख्य अपघात झाले आहेत. त्यामुळे अगदी त्रस्त झालेले नागरिक देखील रस्त्यावर उतरले. शहरातील भाजपचे आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यावर आक्रमक होता.

या पार्श्वभूमीवर शहरातील आमदारांनी देखील आंदोलन केले होते. त्यानंतर आता या प्रश्नावर शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष देखील सक्रीय झाला आहे. यापूर्वी पक्षाचे पदाधिकारी या विषयावर फारसे सक्रिय दिसले नाही. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नेमका हाच धागा पकडत पदाधिकाऱ्यांचे कान टोचले होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पाठ फिरताच पक्षाचे कार्यकर्तेही सक्रिय झाले. कार्यकर्त्यांनी सोमवारी अचानक महापालिकेच्या मुख्यालयात आंदोलनाची घोषणा केली. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करीत महापालिका डोक्यावर घेतली.

यावेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्री रजेवर होत्या. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनीही रजेवर असल्याचे कारंडे निवेदन नाकारले. निवेदन कोणाला द्यायचे यावरून कार्यकर्त्यांत गोंधळ होता. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी चक्क दुसऱ्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांना निवेदन दिले.

वस्तूत: ज्या अतिरीक्त उपायुक्त श्रीमती झगडे यांना निवेदन दिले, त्यांचा या विषयाशी काहीही संबंध नाही. शहरातील खड्डे आणि रस्ते यांची दुरुस्ती व कामकाज शहर अभियंत्यांकडे आहे. कार्यकर्त्यांनी मात्र अभियंत्यांना निवेदन न देता भलत्याच अधिकाऱ्याला निवेदन दिल्याने, तो चर्चेचा विषय ठरला.

या आंदोलनात कार्यकर्ते आणि वरिष्ठ पदाधिकारी यांच्यातही अंतर दिसून आले. काही पदाधिकारी या आंदोलनात सहभागी नव्हते. खड्डे प्रश्न राजकीय दृष्ट्या गंभीर आहे. त्यावर कार्यकर्त्यांना उशिरा का होईना जाग आली. मात्र निवेदन देताना जखम डोक्याला आणि मलम पायाला अशी स्थिती झाली.

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना शिंदे पक्ष रस्त्यावर उतरला. परंतु दोन महिन्यांपासून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यावर आंदोलन करीत आहे. ठाकरे पक्षाने मोठा मोर्चा काढत शक्ती प्रदर्शन केले. सत्ताधारी भाजप देखील या प्रश्नावर सक्रिय होता. दृष्टीने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षही आता जागृत झाला असे म्हणता येईल.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT