Shalarth ID Scam Maharashtra Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shalarth ID Scam : शिक्षण खात्यात खळबळ! ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात खरातचा सहभाग? दीपक केसरकरांच्या अडचणी वाढणार?

Suspicions rise over Nashik Ashok Kharat involvement in the Shalarth ID scam during Deepak Kesarkar tenure as Education Minister : राज्यात गाजलेल्या शालर्थ आयडी घोटाळ्यात नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचा सहभाग असल्याच संशय व्यक्त केला जात आहे.

Pradeep Pendhare

Shalarth ID Scam Maharashtra : राज्यात गाजलेला आणि अजूनही तपासावर असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात, नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचा थेट सहभाग असल्याचा संशय समोर येऊ लागला आहे.

अशोक खरातचा भाऊ या घोटाळ्यातील रडारवर आला आहे. या संशयामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) नेते तथा तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर पु्न्हा एकदा अशोक खरात याच्या संबंधांवरून अडचणीत येण्याची शक्यतेच्या चर्चेनं बळ घेतला आहे.

नाशिकमधील (Nashik) विकृत भोंदूबाबा अशोक खरात याने बुवाबाजीच्या नावाखाली महिलांचे केलेले लैगिंक शोषण राज्यात गाजत आहे. पुरोगामी महाराष्ट्राची या प्रकरणामुळे देशपातळीवर अब्रू निघू लागली आहे. लोकप्रतिनिधी, खासदार-आमदार, मंत्री, माजी मंत्री, उच्च शिक्षित आयएएस, आयपीएस अधिकारी देखील अशोक खरात याच्या भोंदूगिरीचे बळी ठरले आहेत.

जवळपास 39 ते 40 आजी-माजी मंत्र्यांसह अनेक उच्च अधिकाऱ्यांबरोबर अशोक खरात संपर्कात असल्याची चर्चा आहे. तसे विरोधकांकडून गंभीर आरोप देखील केल जात आहेत आणि व्हिडिओ अन् फोटो देखील समोर येत आहेत. यातच राज्यात गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात अशोक खरात याचा थेट सहभाग असल्याची चर्चा आहे.

अशोक खरात याचा भाऊ दिलीप खरात हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी इथल्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांना मिळालेला ‘शालार्थ आयडी’ (Shalarth ID) कायदेशीर प्रक्रियेतून मिळाला की, तो बनावट आहे, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

केसरकरांचा मंत्री कार्यकाळ चर्चेत...

काही विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, 2022 मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात, अशोक खरातने आपल्या प्रभावाचा वापर करून हा आयडी मिळवून दिल्याची चर्चा राज्यातील शिक्षण विभागात रंगली आहे.

केसरकर पुन्हा चर्चेत

नाशिक आर्थिक गुन्हे शाखा आता दिलीप खरात यांची याप्रकरणी चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिलीप खरात याच्याबरोबर शिक्षण विभागातील अन्य काही महत्त्वाच्या फाईल्स बेकायदेशीरपणे मंजूर केल्याच्या चर्चेनं जोर पकडला आहे. यातून एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर पुन्हा चर्चेत आले आहेत.

चौकशीच्या भीतीनं शिक्षण विभाग दबावात

अशोक खरात याला अटक झाल्यानंतर त्याच्या राजकीय संबंधात रूपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची सर्वाधिक चर्चेत आहेत. याच कथित संबंधांमुळेच नियमांना बगल देऊन काही कामे मार्गी लावल्याचा संशय व्यक्त होत आहे. शिक्षण विभागातील काही फाईल्स अशोक खरात याच्या दबावाखाली मंजूर झाल्याची चर्चा आहे. याची चौकशी होण्याच्या चर्चेने शिक्षण विभागातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यात अधिकृतरित्या अद्याप कोणताही पुरावा नसला, तरी पोलिसांच्या रडारवर ही चौकशी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT