Eknath Shinde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: शिवसेना शिंदे पक्षात गटबाजी उफाळली...पदाधिकाऱ्यांची आज एकनाथ शिंदेंकडे धाव?

Shinde Faction Faces Infighting Leaders Rush to Eknath Shinde: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नवनियुक्त सचिव राम रेपाळे यांच्या स्वागताला शहरातील निम्म्याहून अधिक नेत्यांनी मारली दांडी

Sampat Devgire

Shivsena Shinde News: शिवसेना शिंदे पक्षात गटबाजीला थारा नाही. गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असे नेते सांगत होते. मात्र त्याच बैठकीत गटबाजीचे उघड उघड प्रदर्शन सुरू होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाढती गटबाजी चर्चेचा विषय आहे.

महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार हालचाली सुरू आहेत. शहराचा नेता कोण? आणि उमेदवारी देणार कोण? यावरून पक्षाच्या नेत्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे गटबाजी दूर करण्यासाठी आणि नेत्यांची चर्चा घडवून आणण्यासाठी नवनियुक्त सचिव राम रेपाळे काल नाशिक शहरात आले होते. पक्षाच्या कार्यालयात त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम होता. माजी खासदार हेमंत गोडसे आणि उपनेते अजय बोरस्ते आणि त्यांचे समर्थक वगळता फारसे कोणीही नेते बैठकीला फिरकलेच नाही. त्यामुळे सचिव राम रेपाळे यांनाही शहरातील गटबाजीची जाणीव झाली असावी.

यासंदर्भात शहरातील उपनेते अजय बोरस्ते आणि हेमंत गोडसे यांचा एक गट तर इतर नेत्यांचा दुसरा गट अशी स्थिती असल्याचे बोलले जाते. संदर्भात आज शहर अध्यक्ष बंटी तिदमे आणि माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी ठाणे येथे जात आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच पक्षातील नेत्यांमध्ये असा बेबनाव निर्माण झाला आहे.

नाशिकमध्ये आलेले सचिव रेपाळे यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अपेक्षित असलेली शिवसेना आपल्याला निर्माण करायची आहे. त्यामुळे अतिशय कष्टाने घउभ्या केलेल्या शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत गटबाजीचे ग्रहण लागू देणार नाही, असा निश्चय त्यांनी व्यक्त केला.

सचिव रेपाळे यांच्या उपस्थितीतच शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गटबाजी बाबत उघड उघड तक्रारी केल्या. गटबाजी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. आगामी महापालिका निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम करण्याची गरज असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. एकंदरच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात निर्माण झालेली गटबाजी या पक्षाला मारक ठरण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT