Raosaheb Kheware Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर लैंगिक शोषणाचा गुन्हा; 12 ते 15 वर्षे अत्याचाराचा आरोप, दोन डॉक्टरही अडकले!

Eknath Shinde Shivsena Ahilyanagar district chief Raosaheb Kheware booked after a woman alleges 12-15 years of sexual exploitation. Two doctors also named : लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या शहरांत लैंगिक शोषण केल्याची फिर्याद; सात ते आठ वेळा गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा आरोप, राहुरीच्या दोन डॉक्टरांचाही गुन्ह्यात समावेश

Pradeep Pendhare

Shrirampur sexual exploitation case : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाप्रमुख रावसाहेब सदाराम खेवरे यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 12 ते 15 वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत केला आहे. या प्रकरणात राहुरी येथील दोन डॉक्टरांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या घटनेमुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, रावसाहेब खेवरे यांनी संबंधित महिलेची ओळख करून घेत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत तिला श्रीरामपूरमधील (Shrirampur) संजयनगर परिसरातील घरी नेले. पुढील काळात वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यास भाग पाडून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे.

गर्भपात केल्याचा आरोप

या 12 ते 15 वर्षांच्या कालावधीत संबंधित महिला सात ते आठ वेळा गर्भवती राहिली. त्यानंतर रावसाहेब खेवरे यांच्या मदतीने गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्याचा आरोप (Crime) फिर्यादीत करण्यात आला आहे. यासाठी राहुरी येथील डॉ. संजयदादा म्हसे आणि डॉ. अनंत शेकुकर यांनी मदत केल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. वारंवार गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यामुळे प्रकृती खालावली, शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आणि रक्त चढवण्याची वेळ आली. तसेच गर्भाशयात गाठ निर्माण झाल्याचा दावाही महिलेने फिर्यादीत केला आहे. या घटनांमुळे आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याचेही तिने नमूद केले आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य

फिर्यादीतील माहितीनुसार, संबंधित महिला श्रीरामपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई अशा वेगवेगळ्या शहरांत राहत होती. या काळात रावसाहेब खेवरे यांनी लग्नाचे आश्वासन देत आपले शोषण सुरू ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. पुढे चाकण येथे खोटे आश्वासन देऊन खेवरे यांनी आपल्याला सोडून दिल्याचेही महिलेने म्हटले आहे. त्यानंतर आई आणि मुलाने तिला श्रीरामपूर येथे आणले. स्थानिक रुग्णालयात तपासणी केल्यानंतर गर्भाशयाच्या समस्येमुळे जीवाला धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी रावसाहेब खेवरे यांच्यासह डॉ. संजयदादा म्हसे आणि डॉ. अनंत शेकुकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विशाल खैरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

खेवरे यांची राजकीय वाटचाल

रावसाहेब खेवरे गेल्या 30 वर्षांहून अधिक काळापासून अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या या गंभीर गुन्ह्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, फिर्यादीतील आरोपांची सत्यता आणि या प्रकरणातील संबंधितांची भूमिका पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT