Girish Mahajan, Eknath Shinde & Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan politics: गिरीश महाजनांच्या मार्गात आता शिंदे सेनेचा स्पीडब्रेकर!

Eknath Shinde; Shivsena oppose Girish Mahajan as guardian minister of Nashik-नाशिकचे पालकमंत्री म्हणून दादा भुसे यांची नियुक्ती व्हावी यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आग्रही

Sampat Devgire

Shivsena News: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली. आता नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. याबाबत पक्षाच्या नेत्यांनी थेट मागणीच केली आहे.

नाशिकचे पालकमंत्री कोण? याबाबत गेले महिनाभर विविध तर्क वितर्क केले जात होते. त्यानंतर भाजपचे नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली. मात्र या नियुक्तीने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

या संदर्भात पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे आता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांनी थेट आपली अपेक्षाच व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात या विषयावरून चांगलीच जु॔पणार अशी स्थिती आहे.

यासंदर्भात शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी थेट पक्षाची भूमिका सांगितली आहे. दादा भुसे हे जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांना विविध कामांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे तेच पालकमंत्री असावेत, अशी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील शिवसेना शिंदे पक्षालाच मिळाले पाहिजे. यावर आम्ही ठाम आहोत यासंदर्भात कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या नेत्यांशी संवाद साधला आहे. येत्या आठवड्याभरात अपेक्षित नियुक्ती होतील, असा आमचा विश्वास आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा विचारात घेऊनच भारतीय जनता पक्षाला नाशिकचे पालकमंत्री पद हवे आहे. या संदर्भात मंत्री महाजन हे देखील त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे लपून राहिलेले नाही. गेले काही दिवस ते सातत्याने नाशिकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत.

आगामी काळात पालकमंत्री पद हा वादाचा विषय होऊ नये म्हणून वरिष्ठ स्तरावर नेत्यांचे प्रयत्न आहेत. मात्र यामध्ये शिवसेना शिंदे गट आक्रमक आहे. खाते वाटपातही आपल्यावर अन्याय झाल्याची भावना या पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे. त्यामुळेच महायुतीत पालकमंत्री पदावरून सर्वकाही अलबेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाच्या वादावरून महायुतीत नवी ठिणगी पडते की काय? अशी स्थिती आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आहेत. त्या खालोखाल भाजपचे पाच आमदार आहेत. त्या तुलनेने अवघे दोन आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्री पद मिळणार का? आणि त्यासाठी कोणता निकष लावला जाईल, हा नवा प्रश्न आहे. रायगड जिल्ह्याला एक आणि नाशिकला वेगळा असा न्याय दिला जाईल का, असा प्रश्न देखील भाजपचे पदाधिकारी विचारत आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT