Eknath Shinde politics : एकनाथ शिंदे 'इफेक्ट'? दादा भुसेंचे पुनर्वसन की जिल्हा निर्मिती?

Nashik Raigad Guardian Ministers ShivSena DCM Eknath Shinde Mahayuti government : प्रजासत्ताक दिनाला जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव लांबणीवर पडल्याने पालकमंत्री नियुक्ती वादात?
Eknath Shinde politics
Eknath Shinde politics Sarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News : राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्ती दोन दिवसांपूर्वी झाल्या. या नियुक्त्यांना 24 तासही उलटत नाहीत, तोच दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या विषयावरून राजकारण तापले आहे.

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन (भाजप) आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीमागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इफेक्ट आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमधील राजकीय सत्ता स्पर्धा टोकदार होण्याची चिन्हे आहेत.

पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. त्यात शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांचे नाव नव्हते. त्यावरून शिवसेना शिंदे गटात नाराजीचे चित्र होते मंत्री गोगावले समर्थकांनी तर या संदर्भात थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यामुळे या नियुक्त्या वादात सापडल्या होत्या.

Eknath Shinde politics
Sanjay Raut : सैफवरील बांगलादेशीचा चाकूहल्ला, हा रहस्यमयी प्रकार; संजय राऊतांना भाजप काहीतरी लपवत असल्याची शंका

राज्यात काही जिल्ह्यांची नव्याने निर्मिती होणार आहे. त्याची घोषणा प्रजासत्ताक दिनी अर्थात 26 जानेवारीला अपेक्षित आहे. यामध्ये मालेगाव जिल्हा होण्याची शक्यता होती. त्यामुळे दादा भुसे यांची मालेगावचे पालकमंत्री म्हणून घोषणा होईल, अशी शक्यता होती. मात्र जिल्हा निर्मितीची घोषणा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे नाशिक (Nashik) आणि रायगडच्या पालकमंत्र्यांना त्याचा फटका बसला.

Eknath Shinde politics
Prakash Solanke : आमदार सोळंकेंनी मंत्री मुंडेंबाबत नेमकी कोणती बाब सांगितली; अजितदादा निर्णय घेणार?

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा आमदार आहेत. रायगड जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत. संख्या बळानुसार शिवसेना शिंदे पक्षाला रायगड तर नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला पालकमंत्री पद मिळणे अपेक्षित होते.

मात्र भारतीय जनता पक्षाच्या आगामी वाटचालीचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्यात अनुक्रमे गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांची नियुक्ती केली होती. मुख्यमंत्री परदेशात असतानाही उपमुख्यमंत्री शिंदे आक्रमक झाल्याने आता यांनी युक्त्या वादात सापडल्या आहेत. आता येथे नव्याने नियुक्ती होते की, राजकीय तोडगा काढला जातो याची उत्सुकता आहे.

नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नंदुरबारचे पालकमंत्री पद माणिकराव कोकाटे यांच्या ऐवजी गिरीश महाजन यांना द्यावा,‌असा एक मतप्रवाह आहे. नाशिकचे पालकमंत्री पद माणिकराव कोकाटे यांना देऊन त्यावर तोडगा काढल्या जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात स्थानिक आमदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस परदेशातून परतल्यावर यावर काय तोडगा काढला जातो याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com