Satyajeet Tambe legal notice Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe legal notice : आमदार तांबे शिंदेच्या शिलेदारावर संतापले; माफी मागा, बजावली 10 कोटीचा दावा ठोकण्याची नोटीस

Satyajeet Tambe Issues Legal Notice to Vinod Suryawanshi Over Allegations | Eknath Shinde Shivsena News : संगमनेरमधील म्हाळुंगी नदीपुलाच्या श्रेयवादावरून एकनाथ शिंदे शिवसेना पदाधिकारी आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यात वाद उफळला आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra political controversy : संगमनेरमधील नगरपालिका निवडणुकीत आरोपांची राळ सुरू आहेत. आरोपांच्या फैरीतून वर्चस्व निर्माण करण्याच्या नादात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शहरप्रमुख कायदेशीर कचाट्यात सापडला आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे तथा नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. चार दिवसांत माफी मागावी अन्यथा दहा कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा करणार असल्याचा इशारा सत्यजित तांबे यांनी दिला आहे.

संगमनेर (Sangamner) शहरातील म्हाळुंगी नदीवरील पुल पडला होता. हा पुल मोठ्या प्रतीक्षेनंतर पुल उभारण्यात आला. या पुलाचा श्रेयवाद नगरपालिका निवडणुकीत उफाळून आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संगमनेर शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी आमदार सत्यजित तांबे यांना लक्ष्य केलं.

काँग्रेस (Congress) पुरस्कृत आमदाराने म्हाळुंग पुलाचे काम रखडवले, असा गंभीर आरोप विनोद सूर्यवंशी यांनी सत्यजित तांबे यांच्यावर केला. यामुळे आमदार तांबे चांगलेच आक्रमक झाले असून, हे सगळे आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. केलेले आरोप चार दिवसांत सिद्ध करावेत अन्यथा दहा कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा त्यांनी वकील अमोल घुले यांच्यामार्फत पाठवलेल्या कायदेशीर नोटीसेद्वारे दिला.

विनोद सूर्यवंशी यांच्या खोट्या माहितीमुळे आपली सार्वजनिक प्रतिमा खराब झाली आहे. तसंच कायद्याचं उल्लंघन झालं आहे. कायद्यातील तरतुदींनुसार सूर्यवंशी यांच्याविरोधात 10 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा तसेच गुन्हा नोंदविण्याचा इशारा सत्यजित तांबे यांनी दिला आहे.

विनोद सूर्यवंशी यांनी चार दिवसांच्या आत दोन लायक साक्षीदारांच्या उपस्थितीत लेखी माफी मागावी तसेच त्याला वृत्तपत्रे आणि समाज माध्यमाद्वारे प्रसिद्धी द्यावी, अशी मागणी नोटीसमध्ये करण्यात आली आहे. अशी माफी न मिळाल्यास कायदेशीर पर्याय अवलंबणार असल्याचे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार तांबेंची भूमिका...

आमदार तांबे यांनी म्हाळुंगी नदीच्या पुलाबाबत भूमिका मांडली आहे की, 'म्हाळुंगी पुलासाठी लागणारा संपूर्ण निधी तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीच मंजूर केला. शिवसेना किंवा त्यांच्या नेत्यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. नाटकी नाल्याच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेला निधी नगरपालिकेने पुढे व्यावसायिक संकुलाकडे वळवला. त्याच निधीतून म्हाळुंगी पुलाचे काम सुरू झाले. त्यामुळे काही संबंध नसताना आपल्यावर पुलाचे काम रखडवण्याचा आरोप करण्यास कोणताही आधार नाही.'

मी अपक्षच; सत्यजित तांबे

तसंच, आपण पूर्णपणे अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेलो आहोत. विधान परिषदेत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेले नाही. याउलट, आरोप करणाऱ्यांचे ज्येष्ठ नेते कधी त्यांना भाजपचे, तर कधी काँग्रेसचे असल्याचे म्हणतात. ही विधाने गोंधळलेल्या अवस्थेत आणि अज्ञानाने केलेली असून, यातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT