Eknath Shinde
Eknath Shinde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde: पुणे-जालन्यातल्या कंपन्यांसाठी दावोसला जाण्याची गरज काय; ठाकरे गटातल्या नेत्यानं डिवचलं

सरकारनामा ब्यूरो

Subhash Desai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेला गेले होते. त्याठिकाणी विविध उद्योग कंपन्यांशी १ लाख ३७ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मात्र, या दौऱ्यावरुन आणि केलेल्या करारावरुन आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळींकडून शिंदेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

माजी उद्योगमंत्री व ठाकरे गटाच्या नेते सुभाष देसाई यांनी नाशिक येथे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. देसाई म्हणाले, दावोसला जाऊन महिंद्रा अँड महिंद्रासारख्या पुणे, जालनामधील कंपनीसोबत करार केले. हे करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय? मंत्रालयात बसूनही करता आले असते. आमचे उद्योग गुजरातमध्ये जातात आणि ते दावोसला जाऊन करार करतात अशी टीका सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी शिंदेंवर केली.

कोरोना संकट काळात उद्धव ठाकरे यांनी चांगलं काम केलं असे मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा पाहिजे, मात्र त्यांना गद्दारी करुन पायउतार करण्यात आलं. सुजाण मतदार शिवसेनेशी गद्दारी केली, त्यांच्या पाठीशी कसे उभे राहतील? नोंदणी कोणीही केली तरीही मतदार सुजाण आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आम्ही काही केलं नाही असं फडणवीस सांगत होते, तरी चार महिन्यांनी गिरीश महाजन यांनी खरं काय ते सांगितलंच.

विधानपरिषदेत भाजपचं संख्याबळ कमी आहे, म्हणून त्यांना विधेयक मान्य करता येत नाही, म्हणून ठिकठिकाणी असे प्रकार घडत आहेत असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडी विधानपरिषदेत भक्कम आहे, ते भाजपच्या डोळ्यांत खुपत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची एकजूट कायम ठेवण्यासाठी पाचही जागी मदत केली. मी उद्योगमंत्री होतो, पदवीधर मुलांसाठी स्टार्टअप सुरु केले, स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले. पदवीधर यांना नोकरी मिळवून देण्यासाठी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन यावेळी त्यांनी सरकारला केले.

दावोसला जाऊन महिंद्रा अँड महिंद्रासारख्या पुणे,जालनामधील कंपनीसोबत करार केले. हे करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय? मंत्रालयात बसूनही करता आले असते, मग मुख्यमंत्र्यांनी दावोसला नेमकं केलं काय? असा सवालही देसाई यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

ते उद्योजक परदेशातील नव्हे तर..,सुळेंचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथे ज्या कंपन्यांसोबत चर्चा केली ते उद्योजक परदेशातील नव्हे तर हैदराबादचे आहेत असं मोठं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं होतं.

याचसोबत त्यांनी हैदराबादेतील उद्योजकांशी करार करण्यासाठी स्वीत्झर्लंडमधील दावोस येथे जाण्याची गरज नव्हती. मुंबईत बसूनही उद्योजकांना बोलावले असते तर करार झाले असते असाही टोला लगावला. पण तरीही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या दावोस दौऱ्याचे शेअर केलेले फोटो आणि विमान छान होते अशा शब्दांत सुळे यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT