Deepak Sawant Car Accident : मोठी बातमी : माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत कार अपघातात जखमी

Deepak Sawant News : पालघर येथील काशिमीरा भागात अपघात झाला आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत.
Deepak Sawant Car Accident News
Deepak Sawant Car Accident News Sarkarnama

Palghar News : राजकीय नेत्यांच्या अपघाताचे सत्र अजून सुरुच आहे. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत (Dr. Deepak Sawant) यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्याची माहिती समोर येत आहे.

पालघर येथील काशिमीरा भागात अपघात झाला आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Deepak Sawant Car Accident News
ICICI Videocon loan fraud case : वेणुगोपाल धूत यांना देश सोडण्यास बंदी ; उच्च न्यायालयाने त्यांना..

या अपघातात सावंत यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कारला डंपरने धडक दिल्याने हा अपघात झाला. पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.

सावंताच्या पाठिला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पालघर पोलिसांनी डंपरच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

Deepak Sawant Car Accident News
Davos World Economic Forum : शिंदे-फडणविसांची ही फसवाफसवी अजून किती काळ चालणार ? ; काँग्रेसचा टोमणा

पालघर येथील आश्रमशाळेत एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूबाबत संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी डॉ.दीपक सावंत हे शुक्रवारी सकाळी पालघरला जात होते. यावेळी काशिमीरा येथे त्याची कार आली असताना समोरुन येणाऱ्या डंपरची धडक बसल्याने हा अपघात झाला असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com