Eknath Shinde & Latatai Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या अर्धांगिनी त्र्यंबकेश्र्वराच्या चरणी, काय घातले साक़डे...

CM Eknath Shinde’s wife visits Trimbakeshwar temple: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांनी आज ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे पूजा केली.

Sampat Devgire

Mumbai News: विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. आता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासाठी डाव मांडले जात आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी मुंबईत देवाला साकडे घातले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची ओढ लागली आहे. त्यासाठी ते हटून बसल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि महिला सक्रिय झाल्या आहेत. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दोन नेते असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांनी आज दुपारी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतले. त्यांनी मंदिरात जाऊन पूजा देखील केली. यावेळी त्यांच्यासमवेत ठाणे येथील काही कार्यकर्ते आणि आप्त स्वकीय होते. भाजपक़ून देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री स्पर्धेत सर्वात पुढे आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नींकडून त्र्यंबकेश्वराला देखील साकडे घातले आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाला मोठे यश मिळाले. त्यामुळे आपण आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे पूजा करण्यासाठी आलो आहोत, असे त्या म्हणाल्या. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची तीव्र इच्छा आहे.

मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांनी देखील त्यासाठी मंदिरात जाऊन पूजा केली होती. नवी दिल्लीत शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार आणि काही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे लॉबिंग करण्यामध्ये व्यस्त आहेत. राज्यातही शिंदे गटाचे आमदार आपल्या दबाव वाढविण्यासाठी विविध उपक्रम करीत आहेत.

नेत्यांच्या भेटीगाठी आणि राजकीय डावपेचांना वेग आला आहे. अशातच श्रीमती लताताई शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतल्याने त्यांनी देवाला काय साकडे घातले असावे, याची चर्चा सुरू झाली आहे. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी तर हे साकडे नसावे ना, अशी चर्चा आहे.

श्रीमती लताताई शिंदे यांचा हा दौरा पूर्वनियोजित नव्हता. त्यांनी आज दुपारी अचानक त्रंबकेश्वर गाठले. त्यांनी मंदिरात पूजाही केली. त्यावेळी सुरक्षा व्यवस्थेचीही चांगलीच धावपळ उडाली. सामान्य भाविकांना या पूजेमुळे काही काळ ताटकळत थांबावे लागले. मंदिर व्यवस्थापनाकडून श्रीमती शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT