Nilesh Lanke and Vijay Auti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Parner News: निलेश लंकेंची विजय औटींना पुन्हा धोबीपछाड; पारनेर बाजार समितीची दोन्ही पदे राष्ट्रवादीच्या पारड्यात

Parner Market Committee News : पारनेर बाजार समितीची सभापती आणि उपसभापती असे दोन्हीही पदं राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Political News : पारनेर बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे बाबासाहेब तरटे तर उपसभापतीपदी भाऊसाहेब उर्फ बापुसाहेब शिर्के यांची आज (दि.15 मे) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सभापती आणि उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे पारनेरकरांचे लक्ष लागले होते. अखेर आज या निवडी झाल्या आहेत.

पारनेर बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती असे दोन्हीही पदे राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली आहेत. यामध्ये शिवसनेनेला (ठाकरे गट) उपसभापती पद मिळण्याची चर्चा होती. मात्र, ठाकरे गटाच्या संचालकांनी उपसभापतीपद नको, सभापती पद द्या, अशी मागणी केल्याचं बोललं जात होतं. मात्र, सभापती आणि उपसभापती असे दोन्हीही पदं राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

सभापती आणि उपसभापतीच्या निवडीवेळी सभापती पदासाठी बाबासाहेब तरटे आणि उपसभापती पदासाठी बापुसाहेब शिर्के यांचा एकमेव अर्ज आला होता. या दोन्ही जागेसाठी एक-एक अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली. या निवडीवेळी 18 संचालकांपैकी 18 संचालक असल्याचं सांगण्यात येत आहे.

पारनेर बाजार समितीची निवडणूक ही एकतर्फी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांनी महाविकास अघाडी करत बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा जिंकल्या. पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास अघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांनी केलं.

दरम्यान, पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करत महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या. पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक मातब्बर निवडून आले. त्यामुळे सभापती आणि उपसभापती कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनेकांनी यासाठी फिल्डींग लावण्याची चर्चा होती. मात्र, सभापती आणि उपसभापतीपद राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली आहेत.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT