Parner News: पारनेर बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीपदी कुणाची वर्णी? लंकेंसमोर मोठा पेच; 'ही' नावे चर्चेत

Parner Market Committee News : सभापती व उपसभापती पदासाठी अनेकांनी फिल्डींग लावली?
Parner Market Committee News
Parner Market Committee News Sarkarnama

Political News : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर बाजार समित्यांचे निकालही लागले. मात्र, आता बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी कुणाची वर्णी लागणार?

यासाठी सध्या अनेक ठिकाणी रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे पारनेरकरांचे लक्ष लागले आहे.

Parner Market Committee News
ATS Arrests Pradeep Kurulkar: कुरुलकरांच्या भोवती एटीएसने फास आवळला; लॅपटॉप अन् मोबाईलचे होणार तांत्रिक विश्लेषण

पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करत महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या. पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक मातब्बर निवडून आले. त्यामुळे आता सभापती आणि उपसभापती कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पारनेर बाजार समितीची निवडणूक ही एकतर्फी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांनी महाविकास अघाडी करत बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा जिंकल्या. पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास अघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांनी केलं.

Parner Market Committee News
Abdul Sattar on Sanjay Raut : संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, मी ही देईन; सत्तारांचे आव्हान

या पार्श्वभूमीवरच पारनेर बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी अनेकांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. माजी सभापती प्रशांत गायकवाड, अशोक सावंत, बाबाजी तरटे, गंगाराम बेलकर, अशोक कटारीया तर रामदास भोसले, शंकर नगरे, डॉ.पद्मजा पठारे, डॉ.आबासाहेब खोडदे, विजय पवार ही नावे चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.

मात्र, यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात सभापती आणि उपसभापती पदाची माळ पडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, सभापती आणि उपसभापतीपदी कुणाला संधी द्यायची? हा पेच आमदार लंके आणि माजी आमदार औटी यांच्यासमोर असल्याचे बोलले जात आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com