Shakarrao Gadakh
Shakarrao Gadakh  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar News : '' निवडणूक आयोगाचा निर्णय दुर्दैवी; पण...''; आमदार गडाखांकडून राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट

सरकारनामा ब्यूरो

विनायक दरंदले -

Ahmednagar News : निवडणूक आयोगाने ठाकरे गटाचे धनुष्यबाण चिन्ह इतरांना दिले असले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित असलेले सर्व सैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्ताचं पाणी करुन आपली ताकद दाखवून देतील. या संकटसमयी मी व माझे कार्यकर्ते भक्कमपणे ठाकरे यांच्याच पाठीशी राहणार आहे असा विश्वास माजी जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला.

नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सोमवारी(दि.२०) दहा लाख रुपये खर्चाच्या सौरउर्जा प्रकल्पाचे उदघाटन झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

निवडणूक आयोगाने घेतलेला अनाकलनीय निर्णय अनेकांना रुजलेला नाही. या निर्णयाने उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक खचून जाणार नाहीत उलट नव्या जोशात बाळासाहेबांचे विचार घराघरात व मनामनात रुजविण्यास कटिबद्ध आहेत असे सांगून उध्दव ठाकरे घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी भक्कम उभे राहणार असेही त्यांनी सांगितले.

नेवासे विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव करुन शंकरराव गडाख(Shankarrao Gadakh) क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या बॅट चिन्हावर निवडून आल्यानंतर त्यांना महाविकास आघाडी सरकार मध्ये उध्दव ठाकरे यांनी जलसंधारण मंत्रीपद दिले होते. सत्तांतर झाल्यानंतर गडाख यांनी सोनईत कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निश्चय जाहीर केला होता.

आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर त्यांनी आपण त्याच भूमिकेशी ठाम राहुन ठाकरे गटाची बाजू अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT