Pune News : शिक्षण विभागात खळबळ; पाच हजारांची लाच स्वीकारताना महिला लेखाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Pune ACB News : टेबलच्या ड्रावरमध्ये सुमारे ६० हजार रुपये आढळून आले
Pune ACB News
Pune ACB NewsSarkarnama

Pune News : सेवा पुस्तिकेत वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण विभागातील वरिष्ठ महिला लेखाधिकाऱ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले. कॅम्पमधील सिनेगॉग स्ट्रीट येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयात सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

Pune ACB News
Pankaja Munde : कसब्यात बापटांचा आशिर्वाद आवश्यक वाटला असेल; पंकजा मुंडेंचा भाजपलाच चिमटा

प्रमिला प्रभाकरराव गिरी (वय ३८, वरिष्ठ लेखाधिकारी वर्ग-२) असे कारवाई करण्यात आलेल्या महिला लेखाधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांच्या निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सेवा पुस्तिकेत नोंद केली जाते.

सहावा आणि सातव्या वेतन आयोगानुसार सेवा पुस्तिकेत वेतन निश्चित करण्यासाठी लेखाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणि शिक्का आवश्यक असतो. त्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार एका शिक्षिकेने केली होती.

Pune ACB News
Politics : शिंदेंच्या निशाण्यावर आता दोन्ही राऊत; लोकसभेतील अन् राज्यसभेतील गटनेतेपद घालविणार!

या तक्रारीची पडताळणी केली असता गिरी यांनी तक्रारदाराकडे सहा हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयात दुपारी अडीच वाजता छापा टाकून लेखाधिकारी गिरी आणि कनिष्ठ लेखापरीक्षक अनिल श्रीधर लोंढे या दोघांना ताब्यात घेतले.

Pune ACB News
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना केलेल्या फोनबाबत पंकजा मुंडेंनी सोडलं मौन; म्हणाल्या...

दरम्यान, कार्यालयाची झडती घेतली असता टेबलच्या ड्रावरमध्ये सुमारे ६० हजार रुपये आढळून आले. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com