MSRTC service starts
MSRTC service starts Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`एसटी`ची गाडी आली रुळावर...प्रवासी मात्र बांधावर!

Sampat Devgire

नाशिक : संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी उच्च न्‍यायालयाचा (Mumbai High court) अल्‍टीमेटम शुक्रवारी संपला. अशात संपकरी (MSRTC Strike) कर्मचाऱ्यांचा (Employees) आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एसटी बससेवा पूर्वपदावर आलेली आहे.

विलिनिकरणाच्‍या मुद्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्‍मुमूळे एसटी बससेवा पूर्णपणे ठप्प झालेली होती. शासनस्‍तरावर वेतनवाढ जाहीर केलेली असताना एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्‍या मुद्यावर ठाम होते. अशात वारंवार मुदत देऊनही कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नव्‍हता. अशात उच्च न्‍यायालयात सुनावणी होऊन न्‍यायालयातर्फे कामावर हजर होण्याच्‍या सूचना देण्यात आल्‍या होत्या. यानंतर मात्र दरदिवशी कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्‍याने वाढ होत होती. सद्यःस्‍थितीत नाशिक विभागातील सर्व तेरा आगारांतून एसटी एससेवा पूर्ववत झालेली आहे.

चार हजार ७३२ कर्मचारी रुजू

नाशिक विभागात कार्यरत असलेले चार हजार ७९० कर्मचार्यांपैकी तब्बल चार हजार ७३२ कर्मचारी कामावर रुजू झालेले ओहत. शुक्रवारी दिवसभरात चार चालक, बारा वाहक, तीन चालक-वाहक, दोन कार्यशाळा, एक प्रशासकीय कर्मचारी असे एकूण २२ कर्मचारी कामावर हजर झाले. विभागात ५८ कर्मचारी अखेरच्‍या दिवसापर्यंत रुजू झालेले नसल्‍याचे सांगण्यात येत आहे. यात २९ चालक, १९ वाहक आणि नऊ यांत्रिकी विभागातील कर्मचारी असून, एक प्रशासकीय कर्मचारी कामावर हजर झालेला नाही. दरम्‍यान शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत नाशिक विभागातून ५१६ बसगाड्या धावल्‍या. या बसगाड्यांतून एक हजार ७१६ फेऱ्यातून प्रवाशी वाहतूक करण्यात आली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT