मनमाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांचे निवासस्थान आणि शिवसेना भवन (Shivsena) असलेल्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्यासाठी निघालेल्या खासदार नवनीत राणा (Navnit Rana) आणि आमदार रवी राणा विदर्भ एक्स्प्रेसने येणार असल्याची माहिती मिळताच मनमाड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. या वेळी पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यामुळे शाब्दिक चकमकही झाली.
शिवसेनेवर टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठण करण्यासाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा विदर्भ एक्स्प्रेसने रात्री मुंबईकडे जात असल्याचे समजताच मनमाडच्या शिसैनिकांनी रात्री दोनच्या दरम्यान रेल्वे स्थानक गाठले. विदर्भ एक्स्प्रेसमध्ये त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.
रेल्वे पोलिसांनी शिवसैनिकांना अडविल्याने रेल्वे पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दीक चकमक झाली. या वेळी शिवसैनिकांनी रेल्वे स्थानकावर हातात भगवे ध्वज घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. ‘उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, नवनीत राणा वापस जावो, वापस जावो, आवाज कोणाचा... शिवसेनेचा’ अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. मात्र, या गाडीत राणा दांम्पत्य नसल्याचे समजल्यानंतर शिवसैनिक माघारी परतले.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक राजेंद्र भाबड, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, तालुका संघटक संजय कटारिया, सुभाष माळवतकर, शहर उपप्रमुख जाफर मिर्झा, छोटू धाकराव, दिनेश घुगे, युवासेनेचे शहराध्यक्ष अमीन पटेल, अंकुश गवळी, तालुका संघटक योगेश इमले, आशु पोहाल, सचिन दरगुडे, सिद्धार्थ छाजेड, योगेश शर्मा, आशिष पराशर, संघटक महेंद्र गरुड, कय्याम सैय्यद, वाहतूक सेनेचे अमजद शेख, बंटी आव्हाड, दीपक खैरे, दीपक मौर्य, ऋतिक मंगवाणा, संदीप गिरमकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.