Kirit somaiya  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kirit somaiya News: 'लव्ह जिहाद' रोखण्यासाठी कडक कायदा करा; किरीट सोमय्यांची मागणी

Kirit somaiya on Love Jihad: कर्जत तालुक्यातील एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar: अहमदनगरच्या कर्जतमध्ये 'लव्ह जिहाद' चे प्रकरण समोर आल्याचा आरोप होत आहे. एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले असून तिचा अद्याप शोध लागलेला नाही. मुलीचा शोध लावून तिला कुटुंबियांच्या ताब्यात द्यावे, यासाठी मुलीच्या आई-वडिलांनी उपोषण सुरू केलं होतं. पण या आंदोलनात भाजपचे माजी खासदार अमर साबळे आणि राम शिंदे यांनी लक्ष घातल्यानंतर उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले.

तर या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. पण मुलगी आणि मुलगा अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. पीडित कुटुंबियांची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज भेट घेतली. यावेळी त्यांनी 'लव्ह जिहाद' रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची गरज असल्याचं म्हटलं.

"महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' मोठ्या प्रमाणात राबवला जातोय का, अशी शंका येत आहे. या प्रकरणांना आळा घालण्यासाठी शासनाने कडक कायदे करून त्याची अंमलबजावणी करावी, किंवा आहे त्या कायद्यात सुधारणा करून ते मजबूत करावे, तसेच प्रशासनाने त्यावर कठोरपणे प्रक्रिया राबवावी, अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, "नगर जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षांमध्ये 'लव्ह जिहाद'चे एक डझनापेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहेत. यातील दहा पीडित परिवारांना आज (7 जून) भेटणार असून जिल्हाधिकारी यांच्याकडे योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार आहे", असं सोमय्या यांनी सांगितलं. सोमय्या यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

"'लव्ह जिहाद' प्रकरणात विशिष्ठ समाजाची मुले हे दलित, पीडित, गरीब कुटुंबातील 18 वर्षाखालील मुलींना पळवून नेतात आणि त्या अठरा वर्षे झाल्यानंतर त्यांच्याशी निकाह केला जातो. पण यामध्ये त्या मुलींवर अन्याय अत्याचार होत असल्याचे समोर येत आहे. याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहोत. सरकारकडे आपण 'लव्ह जिहाद'च्या प्रकरणांवर आळा बसावा म्हणून कडक कायदा व्हावा, असे आपल्याला वाटते. 'लव्ह जिहाद' हा हिंदू संस्कृतीला आव्हान देणारा प्रकार असून त्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे", असं सोमय्या यावेळी म्हणाले.

Edited By-Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT