Eknath Khadse On ED, CBI: मविआ नेत्यांना ईडी, सीबीआयचं प्रेशर सहन होईल का?

Maharashtra Politic : राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांंवर ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरु आहेत.
Eknath Khadse On ED, CBI
Eknath Khadse On ED, CBISarkarnama

Eknath Khadse On ED, CBI: तीन पक्ष एकत्र आले तर कुरघोड्या होणं हे स्वाभाविक आहे. पण शेवटी ध्येय हे सत्ता येण्याचचं ठेवाव लागणार आहे. सत्ता येण्यासाठी आज अनुकूल परिस्थिती आहे. कर्नाटकच्या विजयामुळे त्यात भर पडली आहे. राज्यात आणि देशातही भाजप विरोधात वातावरण तयार होत आहे. अशी भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मांडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली. (Will the leaders of Mahavikas Aghadi bear the pressure of ED, CBI)

राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांंवर ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरु आहेत. या कारवायांच्या माध्यमातून विरोधी पक्षनेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होणारे नेते भाजपमध्ये जात आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेते ईडी, सीबीआयच्या कारवायांचं प्रेशर कसं सहन करणार, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. (Maharashtra Politics)

Eknath Khadse On ED, CBI
Ekanath Khade on BJP Offer: भाजपमध्ये परतण्याची विनोद तावडेंची ऑफर स्वीकारणार? एकनाथ खडसेंनी दिलं उत्तर

यावर उत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले की, ''ज्यांना जायंच होतं ते गेले, पण नाथाभाऊच्या इडी फिडी सीबीआय, लागले पण अजूनही ते विरोधी पक्षात आहेत ना, पण जे घाबरले ते गेले.ज्यांच्या संघर्ष करायची हिंमत आहेत, जे पक्के आहेत. ते आहेत. हेच पक्के पुन्हा एकदा सरकारमध्ये येतील. जयंत पाटील, अजित पवार, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, मी आम्हालाही नोटीसा आल्या पण एवढं सगळ होऊनही आम्ही ठाम आहोत की नाही. पण ते खोटे आरोप करत आहेत. (ED,CBI Enquiry)

ईडीवाले (ED Raid) शासनाचे बांधिल लोक आहेत, सरकार आदेश देईल. तसं काम करण हे त्यांचं कर्तव्य आहे. ईडी किंवा इतर यंत्रणांना आपण दोष देऊ शकत नाही. उठ सुट ईडी सीबीआयं लावण, आरोप करणं अशा गोष्टींचा लोकांना कंटाळा यायला लागला आहे. लोकांना लक्षात आलयं की हे विकासावर बोलत नाहीत. यांनी काय केलंय हे मांडत नाहीत. निवडणूक आली की राममंदिर काढतील. मंदीराचं काम होईल . जय बजरंग बली म्हणतील, मीही हिंदूत्ववादी आहे पण मी राजकारणासाठी त्याचा वापर करत नाही. पण तुम्ही विकास, महागाई, भ्रष्टाचारावर का बोलत नाही. ३००-३०० माणसं मरत आहेत. खेळाडू मुली महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. पण ब्रिजभूषण सारख्या माणसावर साधी कारवाई होत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

Eknath Khadse On ED, CBI
Sujay Vikhe On Lok Sabha : 'नगर दक्षिण लोकसभेचा भाजप उमेदवार कोण?' ; सुजय विखे म्हणाले..

खडसे म्हणाले, २०१४ मध्ये आमच्याकडे, सत्ता, पैसे, मोठा नेता. असं काही नव्हतं. पणआमच्या सारखे छोटे-मोठे नेते होतेच की. आमची तेव्हा इच्छा होती की नवीन सरकार आलं पाहिजे आणि ते आलं. पण आज सर्वत्र अस्वस्थता आहे. भाजपवाले (BJP) कितीही म्हणत असले ती आमचे दिडशे -दोनशे येतील पण निर्णय हा निवडणुकीनंतरच होईल.

आतापर्यंत जे सर्वे झाले त्यात काय आलं. कर्नाटकात महिनाभर आधी जर कोणी बोलल असतं की काँग्रेसचं सरकार येणार आहे. तर त्याच्यावर विश्वास बसला नसता. कारण जनतेच्या मनात उद्रेक होता. त्यांनी आरक्षणाचा मुद्दा काढला, पैसे, खोक्यांचा वापर केला. पण पैसे घेऊनही कोणीही त्यांच्या आमीषासा बळी पडले नाही. पण काय करायचं ते जनतेने ठरवंल होतं. कर्नाटकात काँग्रेस आलं. तसंच महाराष्ट्रातही १०० टक्के आम्ही येणार. गेल्या ४० वर्षांचा अनुभव आहे. आणीबाणी पाहिलेला माणूस आहे मी. कुठेतरी आतुन जाणीव होते की सरकार अस्थिर दिसतयं, असही त्यांनी यावेळी म्हटलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com