Sai Mandir Security Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi Sai Mandir Darshan : साईबाबांच्या दर्शनाला लागणार ओळखपत्र, शिर्डी ग्रामस्थांना...

Pradeep Pendhare

Shirdi News : शिर्डी येथील साई समाधी मंदिरात प्रवेश करताना यापुढे शिर्डी ग्रामस्थांना ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. ओळखपत्र दाखवूनच मंदिर परिसरात प्रवेश मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर साई संस्थान प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने दर्शन रांगे व्यतिरीक्त संस्थानच्या इतर प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार आहे. प्रशासकीय कामातील कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ, इतर प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र तपासून शारीरिक तपासणी करूनच सोडण्याचा आदेश सुरक्षा अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

साई समाधी मंदिर आणि परिसरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी आता ग्रामस्थांना आधार कार्ड सारखे ओळखपत्र बंधनकारक असणार आहे. श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शनासाठी जगभरातून मोठया प्रमाणात साईभक्त येतात. मंदिर परिसर आणि दर्शनरांग परिसरात आठ महाद्वार आहेत. साईभक्तांचे सुलभ दर्शनासाठी या प्रवेशद्वाराचा वापर करतात.

संस्थानच्या अधिपत्याखाली असलेल्या सुरक्षा रक्षक यांना न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साई समाधीच्या दर्शनाबरोबरच आरती, ग्रामदैवत शनी मंदिर, महादेव मंदिर, गणपती मंदिरात दर्शनाला जाताना ओळखपत्र तपासून आणि त्याची रजिस्टरला नांव नोंदणी करुनच गावकऱ्यांना प्रवेशद्वाराने प्रवेश देण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

साई मंदिराच्या प्रवेशद्वार चारने गावकरी यांना मंदिरातील चारही आरतीचे वेळेस गुरुस्थान येथे परिक्रमेसाठी ओळखपत्र पाहून आणि शारीरिक तपासणीनंतर सोडण्यात यावे. तसेच संस्थान प्रशासनामध्ये दैनंदिन कामकाजासाठी येणारे कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व इतर व्यक्तींचे ओळखपत्र पाहून तपासणी करून प्रवेश देण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे. या निर्णयाला शिर्डी ग्रामस्थ कसा प्रतिसाद देतात आणि त्याची अंमलबजावणी संस्थानकडून कशा पद्धतीने होते,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT